औंध कँम्पमधील जवानांचा पूरग्रस्तांच्या बचावकार्यात सहभाग

रमेश मोरे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

-  येथील औंध मिलिटरी स्टेशन मधील युनिट फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्री (जंगी पलटण) रविवार (ता.४) रात्री पासून एक तुकडी महाड परिसरात बचावकार्य करत आहे.

- तर आदेश मिळताच सांगली, रायगड भागात पन्नास जवानांची दुसरी तुकडी बचावकार्यात तैनात करण्यात आली आहे.

जुनी सांगवी : येथील औंध मिलिटरी स्टेशन मधील युनिट फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्री (जंगी पलटण) रविवार (ता.४) रात्री पासून एक तुकडी महाड परिसरात बचावकार्य करत आहे. तर आदेश मिळताच सांगली, रायगड भागात पन्नास जवानांची दुसरी तुकडी बचावकार्यात तैनात करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी औंध कँम्प जवानांचे बचावकार्य या भागत सुरू आहे. आदेश मिळताच जंगी पलटण महाड-रायगड येथील पुुरग्ररस्त लोकांच्या मदतीसाठी रायगडला रवाना करण्यात आली होती. 

एका तुकडीत 1 ऑफिसर, 2 जूनियर, कमांडींग ऑफिसर आणि 56 जवान यांचा समावेश आहे. तर दुस-या तुकडीत 1 कमांडींग ऑफीसर,5 ज्युनिअर ऑफिसर आणि 50 जवान बुधवार (ता.७) पासून बचावकार्य करत आहेत. महाड तालुक्यातील दस्तुरी नाका व बोरवाडी या ठिकाणी पुुुराच्या पाण्यात अडकलेल्या 48 नागरिकांना जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. तर सांगली रायगड भागातून 100 नागरीकांना बाहेर काढण्यात आले.

युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असल्याचे औंध कँप मिलिटरी स्टेशन कडून सांगण्यात आले आहे. या बचावकार्यासाठी बोट, लाइफ जॅकेट, रोप, अँकरिंग रोप, सर्चलाईट त्याचबरोबर ही आपत्तीकालीन स्थिती पाहता आदेश येताच बचावकार्यासाठी अजून  तुकडी तयार ठेवण्यात आली आहे. अशी माहिती औंध मिलिटरी स्टेशन यांच्याकडून देण्यात आली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aundh camp officers to rtescue Sangli Raigad