देशभरात पुण्याच्या गुणवत्तेला महत्त्व - बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औंध - ‘जागतिक पातळीवर तेल व वायू क्षेत्रातील संधी वाढत असताना तांत्रिक गुणवत्ता असलेल्या मनुष्यबळाला खूप मोठी संधी आहे. याप्रकारचे मनुष्यबळ पुण्यातून उपलब्ध होत असून, कंपन्याही पुण्यातील तरुणांनाच संधी देत आहेत. त्यामुळे देशभरात पुण्याच्या गुणवत्तेला नक्कीच मोठे महत्त्व आहे,’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. जागतिक पातळीवर समुद्रातील तेल व वायू क्षेत्रात कार्यरत ‘मॅकडरमट’ या कंपनीच्या बाणेर येथील भारतातील पहिल्या डिजिटल इनोव्हेशन केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बापट बोलत होते.

औंध - ‘जागतिक पातळीवर तेल व वायू क्षेत्रातील संधी वाढत असताना तांत्रिक गुणवत्ता असलेल्या मनुष्यबळाला खूप मोठी संधी आहे. याप्रकारचे मनुष्यबळ पुण्यातून उपलब्ध होत असून, कंपन्याही पुण्यातील तरुणांनाच संधी देत आहेत. त्यामुळे देशभरात पुण्याच्या गुणवत्तेला नक्कीच मोठे महत्त्व आहे,’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. जागतिक पातळीवर समुद्रातील तेल व वायू क्षेत्रात कार्यरत ‘मॅकडरमट’ या कंपनीच्या बाणेर येथील भारतातील पहिल्या डिजिटल इनोव्हेशन केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बापट बोलत होते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार स्नेहलता कोल्हे, मॅकडरमटचे उपाध्यक्ष व माहिती आणि डिजिटल अधिकारी आकाश खुराणा आदी उपस्थित होते.

या वेळी बापट म्हणाले, ‘स्थानिक ते राज्यपातळीवर भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारमधील सहकाऱ्यांची मदत घेऊन रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना सहकार्य करू.’

राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, वायू व तेल संशोधन क्षेत्रात येण्यासाठी खास अभ्यासक्रमाचेही नियोजन केले तर या क्षेत्रात अजून विकासपूर्ण संशोधन होऊन देश विकासाकडे जाईल. या वेळी खुराणा यांनी कंपनीच्या जगभरातील प्रकल्पांची माहिती देऊन, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Web Title: aundh pune news Importance of quality of Pune across the country