मुळा-मुठेच्या स्वच्छतेसाठी 'ऑस्ट्रेलिया'च्या 'जेड्'बाई मैदानात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुणे : मुळा-मुठेच्या स्वच्छतेसाठी चक्क एक ऑस्ट्रेलियन महिला नदीपात्रात उतरणार आहे. गांधी जयंतीला बुधवारी (ता.२) खडकवासला ते कल्याणीनगर यादरम्यान नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे. 'आम्ही पुणेकर' फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या मोहिमेत ऑस्ट्रेलियाची 'जेड्' स्वतः सहभागी होणार आहे

सहा वर्षांपूर्वी भारतात फिरायला आलेली 'जेड्' गंगा नदीच्या सांस्कृतिक प्रवाहापासून प्रभावित झाली. तिच्या स्वच्छतेसाठी ती स्वतः पुढे होऊन काम करत आहे. पुण्यातील

या स्वच्छता मोहिमेबद्दल बोलताना ती म्हणाली,"पवित्र गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरु झालेली मोहीम आता पुण्यापर्यंत पोचली आहे. याचा मला फार आनंद झाला आहे. नदी म्हणजे नुसतं पाणी नसत तर ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक असते. मुळा-मुठेची स्वच्छता आपल्या संस्कृतीला पुनरुज्जीवित केल्यासारखेच आहे." ती पुढील काही दिवस पुण्यात असून ही स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia's J Will for work for Cleaning of mula mutha river