#PuneMurder प्रामाणिक रिक्षाचालक विनाकारण बदनाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

रिक्षा रिकामी असतानाही उर्मट भाषा वापरून भाडे नाकारणे, जवळचा मार्ग सोडून लांबची फेरी मारून भाडे वाढवणे, सुटे पैसे नसल्याचा बहाणा करणे, मीटरमध्ये फेरफार करणे, मीटरमधील भाड्याहून अधिक भाड्याची मागणी करणे, ते नाकारल्यास कुत्सितपणे मानहानीकारक वक्तव्य करणे, उतरण्याचे ठिकाण किंवा रस्ता माहीत नसल्याचा आव आणणे, अशा अनेक कारणांसाठी पुण्यातील काही रिक्षाचालक कुप्रसिद्ध आहेत.
- डॉ. शशिकांत वाडेकर, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, मुंढवा केशवनगर

अशा काही मुजोर रिक्षाचालकांमुळे प्रामणिक रिक्षाचालक मात्र बदनाम होतात; पण हे प्रमाण अगदी कमी आहे.  
- तन्मयी सारवकर

पुण्यातील काही रिक्षाचालक गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देऊन वठणीवर आणावे, तसा कायदा करावा. 
- मोरे

पुणे स्टेशनला लोक बाहेर यायला लागले की उगाच प्रवाशांच्या मागे लागून रिक्षा घ्या साहेब, असे म्हणत रिक्षाचालक मागे लागतात. सगळीकडे यांच्या रिक्षा रस्त्यात उभ्या केलेल्या असतात. स्वारगेटला तर वाटेल तशी रिक्षा उभी केलेली असते. 
- जय

फक्त ओला आणि उबर वापरा. 
- राजू

आरटीओने पुण्यात परवाने खुले करावेत म्हणजे या रिक्षाचालकांना कळून चुकेल. तसेच ज्याला स्वतःच्या पैशाने रिक्षा विकत घ्यायची असेल त्याला खासगी वापरासाठी रिक्षा वापरता आली पाहिजे; पण आरटीओ कार्यालयामध्ये सगळा पैशाचा खेळ आहे. जनतेची कदर नाही. 
- बाळासाहेब

ओला आणि उबरशिवाय पर्याय नाही. रिक्षाचालक खरेच खूप विचित्र प्रवृत्तीचे आहेत. 
- प्रवीण

सरळ रिक्षा सेवा बंद करावी. बिबवेवाडीच्या रिक्षा स्टॅंडवर रिक्षाचालक चहा पित बसतात; पण जवळचे भाडे घेत नाहीत. दुसऱ्या रिक्षाचालकांनाही भाडे स्वीकारूपण देत नाहीत.

Web Title: Authentic autorickshaw driver Unnecessary defamation