Pune : ऑटो क्रॉस स्पर्धेत निकिता टकले-खडसरे अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : ऑटो क्रॉस स्पर्धेत निकिता टकले-खडसरे अव्वल

पुणे : ऑटो क्रॉस स्पर्धेत 14 फेऱ्यांमध्ये 12 फेऱ्या जिंकून निकिता टकले-खडसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, गोवा स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. फार्मर असोसिएशन ऑफ कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धेत प्रथम ट्रॉफी पटकविली आणि लगेच हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत 14 फेऱ्यामध्ये 12 फेऱ्या जिंकल्या. या स्पर्धेमध्ये देशभरातील 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

निकिताने पाऊस वा ट्रॅकवर चिखलमय रस्त्यात कार रेस स्पर्धेत यशाची चुणूक दाखविली. खडतर प्रवासानंतर कर्नाटक स्पर्धा जिंकून, लगेच बायरोड हैद्राबादकडे प्रयाण केले. फार्मर असोसिएशन ऑफ कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धा, हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत मिळालेल्या यशाचे श्रेय निकिता तिचे वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री टकले, पती शुभम खडसरे, व सिंहाचा वाटा प्रशिक्षक चेतन शिवराम यांना असल्याचे आवर्जून सांगते.

पावसाळ्यातील दोन स्पर्धा जिंकल्यानंतर आता गोवा आणि बेंगलोर येथे होणाऱ्या स्पर्धेतही यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे निकिताने सांगितले. कर्नाटक वा हैद्राबादमध्ये कार रेस शौकीन खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्रातील पुण्यातुन सहभागी झालेल्या स्पर्धेकाचा उत्साह व कार चालविण्याची पद्धत पाहुन खूप प्रेरणा दिल्याचे निकिताने आवर्जून नमूद केले. 18 व्या वर्षी कार रेस स्पर्धेत आवड निर्माण झालेल्या निकिताने वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत 6 स्पर्धेत सहभागी होऊन सर्वच स्पर्धेत विजेतेपद पटकाविले आहे.

टॅग्स :punesportsWine