संगणक हाताळण्यासाठी डोके अन् नाक ठरतील उपयुक्त

pune.jpg
pune.jpg

टाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. काजलच्या या यशाने आंदर मावळातील पहिला प्रकल्प राज्य पातळीवर पोहचणार आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या आठव्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात तिच्या प्रकल्पाची निवड झाली. 

भारत सरकार विज्ञान तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे,राज्य विभाग शिक्षक परिषद पुणे यांच्या वतीने झालेल्या विज्ञान प्रदर्शनात तिने हा प्रकल्प सादर केला. हात नसलेले अपंगांना किंवा सामान्य माणसाला उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प आहे. संगणक हाताळताना माऊसचा वापर करावा लागतो, त्यासाठी ताठ बसणे आवश्यक आहे, मान सरळ ठेवून काम करावे लागते. हलगर्जीपणामुळे कधीकधी पाठीचे, मणक्याचे येणारे आजारपण त्यामुळे वाचणार आहे. 

पारंपारिक माऊससह नाक, डोळे यांच्या मार्फत संगणक हाताळता येऊ शकेल असा हा प्रकल्प आहेकाजलचे मार्गदर्शक शिक्षक दिलीप बिरंगळ म्हणाले, ''रिअल टाईम मध्ये माऊस इव्हेंटस म्हणून क्रिया वापरता येईल. थेट व्हिडिओ फीडमधील नाक ट्रिपचे समन्वय आणि हालचाल वापरकर्त्यांना स्क्रीनवर माऊस पाॅईटरचे निर्देशांक आणि हालचाल होण्यासाठी अनुवादित करेल. डावा आणि उजवा डोळा डावीकडे उजवीकडे माऊस क्लिक इव्हेंटस लिंक करतो. वापरकर्त्यांना आवश्यक असलेली एकमेव बाह्य डिव्हाइस म्हणजे वेबकॅम जे व्हिडिओ प्रवाहासह प्रोग्रामला फीड करतो. मनुष्य विविध प्रकारे संगणकाशी परस्पर संवाद साधतो. 'अॅटो ह्युमन रोबोट सिस्टीम फाॅर काँप्युटर इंटरऑक्शन' या नावाने हा प्रकल्प केला आहे. संगणक सुलभ करण्यासाठी मानव आणि संगणकाद्वारे वापरलेले इंटरकोर्स महत्वपूर्ण आहे. 'ह्युमन इंटरॅक्शन (एचसीआय) ची नवीन पद्धत आधुनिक काळात विकसित करीत आहे. चेहरा, इशारे, स्पर्श याचा वापर करून परस्पर संवाद साधता येईल. मुख्याध्यापक विनय कसबे म्हणाले, ''हा प्रकल्प चार ते सहा फेब्रवारी या कालावधीत सांगलीच्या नानासाहेब महाडिक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संकुलात सादर करणारी काजल नागाथली येथील सर्वसामान्य शेतकरी परिवारातील दहावीची विद्यार्थ्यांनी आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com