बापरे! रिक्षा चक्क उलट्या दिशेने धावली...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीचा प्रत्यय पुण्यात वारंवार येतच असतो. अशीच एक घटना पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यात एका रिक्षा उलट्या दिशेने धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुण्यातील संतोष जाधव यांची रिक्षा असून त्यांनी ताशी 80 किमी वेगाने उलटी धावते. 

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

पुण्यात रविवारी बाराव्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्या होते. या सजावट स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या रिक्षाचालकांनी आणलेल्या होत्या. या स्पर्धेत संतोष यांनी उलटी रिक्षा चालवून उपस्थिांची वाहवा मिळवली. तसेच एका चाकावर रिक्षा चालवून त्यांनी विविध स्टंट करुन दाखवले. त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांचे कौतुक तर झाले. 

स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे, तर सभागृह नेतेपदाची माळ घाटेंच्या गळ्यात 

सतोष जाधव हे व्यवसायिक असून त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की,''मी 15 ते 20 वर्षांपासून  उलटी रिक्षा चालविण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहे. एक हौस म्हणून अशी रिक्षा चालवत आहे.  वाहतूक कोंडी, वेगात मी उलटी रिक्षा चालवू शकतो.''
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Rickshaw driver performs Auto rickshaw reverse driving stunt in pune