चलनी नोटा, कागदपत्रांचे निर्जंतुकीकरण होणार सोपे; डीआरडीने निर्माण केले 'हे' २ यंत्र

Automatic UV system developed by DRDO
Automatic UV system developed by DRDO

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने (डीआरडीओ) कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आणखीन दोन उपकरणांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये महत्वाचे कागदपत्रे, चलन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या स्वच्छतेसाठी 'डीआरयूव्हीएस कॅबिनेट' आणि 'यूव्हीसी चलन सॅनिटायझिंग उपकरण' तयार करण्यात आले आहे. 

डीआरडीओची हैद्राबाद येथील रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) या प्रयोगशाळाने 'डीआरयूव्हीएस' हे स्वयंचलित यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली आहे. या उपकरणाच्या मदतीने पासबुक, कागदपत्रे, मोबाइल फोन, लॅपटॉप, चेक सारख्या वस्तूंना स्वच्छ केली जाऊ शकते. त्याचबरोबर या प्रयोगशाळेत आणखीन एक उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या स्वयंचलित 'यूव्हीसी चलन सॅनिटायझिंग' उपकरणाच्या माध्यमातून प्रत्येक नोटेचे निर्जंतुकीकरण करणे सोपे आहे. या उपकरणाच्या 'इनपुट स्लॉटवर' सुट्या चलनी नोटा ठेवल्यावर एकेक करून सर्व नोटा निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होते.
 
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

उपकरणांचे वैशिष्ट्य 
- डीआरयूव्हीएस कॅबिनेटमध्ये स्पर्श न करता वस्तूंना स्वच्छ करणे सोपे
- वस्तूला निर्जंतुकीकरणासाठी उपकरणात ठेव्यासाठी मेकॅनिझम सेन्सर स्विचची सुविधा
- उपकरणांचे परिचालन स्वयंचलित आणि स्पर्शाशिवाय
- सॅनिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर, सिस्टम स्लीप मोडमध्ये जाते
- ऑपरेटरला उपकरणाच्या जवळ उभे राहण्याची आवश्यकता नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com