बोरी बुद्रुक येथे स्वयंचलित हवामान केंद्राचे लोकार्पण

अर्जुन शिंदे
सोमवार, 25 जून 2018

शेतकऱ्यांना http://boriweather.aashaymeasurements.com/default.aspx
या संकेत स्थळावर बोरी बुद्रुक ची सर्व हवामानविषयक माहिती उपलब्ध होईल.

आळेफाटा - बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत, नुकताच स्वयंचलित हवामान केंद्राचा (Automatic weather station) लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना वातावरणाची माहिती मिळण्यासाठी तयार केलेल्या वेबसाईटचे  देखील अनावरण करण्यात आले. दरम्यान लवकरच अँड्रॉइड अॅप देखील शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.

या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे  हवामान सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे, जुन्नरचे तहसीलदार  किरण काकडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, बोरी बुद्रूकच्या सरपंच पुष्पा कोरडे, मुख्यमंत्री ग्रामविकास प्रतिनिधी पूनम सातपुते, गोरक्षनाथ उकिरडे, संदीप जाधव, जय मस्करे, अशोक घोडके, अग्रोवन स्मार्ट व्हिलेजचे अधिकारी डॅनी वोल्टझोक, मुख्य अधिकारी अरविंद गुप्ता, जयप्रकाश कुलकर्णी, आशय मेजरमेन्ट प्रा. लि. कंपनीचे संचालक शंतनू पेंढारकर, राकेश नलावडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. बोरी बुद्रुक गावाचा सकाळ - अग्रोवन स्मार्ट व्हीलेज प्रकल्पात समावेश आहे.

गावाच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे हवामानविषयक सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना करण्यात आलेली असल्याचे पूनम सातपुते यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Automation Weather Centers at Bori Budruk