रिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार

pune
pune

वारजे माळवाडी :  रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे गुरुवारी रिक्षा (क्रमांक MH12 QA 9491) मधून वडगाव ते राहटणी असा प्रवास करीत होते. प्रवासा दरम्यान, त्यांची बॅग या रिक्षामध्ये विसरली. त्यामध्ये एक दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र व रोख 500 रु असा ऐवज होता. रिक्षा चालक नामे आकाश किसन माझीरे (वय 25 रा शिवाजी चौक रामनगर वारजे) यांनी ती बॅग वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली.

बॅगे बाबत कोणतीही लालसा न बाळगता त्यांनी प्रामाणिक पणा दाखविला. त्याबद्दल रिक्षा चालक माझीरे यांचे हस्ते संजय चव्हाण यांना वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक रेखा साळूखे व प्रकाश खांडेकर यांचे समक्ष देण्यात आला.

पोलिस निरीक्षक रेखा साळूखे व प्रकाश खांडेकर यांनी रिक्षा चालक आकाश माझीरे यांचा त्यांच्या या चांगल्या वर्तणुकी बद्दल सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com