अवधूत गुप्ते म्युझिकल कॉन्सर्टची धमाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

सभासद नोंदणीस मधुरांगण ॲपवरूनही अभूतपूर्व प्रतिसाद; नोंदणी सुरू

पुणे - अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणेकर रसिकांना शनिवारी सायंकाळी एकाहून एक सरस गाण्यांच्या सरींनी चिंब भिजवले. ‘बाप्पा मोरया रे’ या सुप्रसिद्ध गीताने आयएलएस लॉ कॉलेजच्या मैदानावर सुरू झालेल्या ‘अवधूत गुप्ते म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट’मध्ये ‘ऐका दाजीबा’, ‘बाई बाई मनमोराचा पिसारा’, ‘ढिपाडी ढिपांग’, ‘पोरी जरा हळू हळू चाल’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’ अशा गाण्यांवर ‘सकाळ-मधुरांगण’च्या सदस्यांनी वय विसरून ठेका धरला. 

‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शन’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘सकाळ मधुरांगण’ या कार्यक्रमासाठी माध्यम प्रायोजक होते.

अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ‘सैराट’ फेम आकाश ठोसर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांना गायिका मुग्धा कऱ्हाडे आणि सारेगमपचे विजेते अनिरुद्ध जोशी यांनी साथ दिली. अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले. ‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शनचे विनोद येडेल्लू यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन ‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शनच्या’ निर्मात्या चेतना विनोद येडेल्लू यांची होती.

मधुरांगणचे त्वरित सभासद व्हा आणि मिळवा हजारो रुपयांच्या फ्री गिफ्ट व्हाउचरचा फायदा
‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय (सकाळी ११ ते सायंकाळी ७)
नोंदणी शुल्क रु. ९९९. नोंदणी करणाऱ्यांना रु. १४९९ किमतीच्या भेटवस्तू, रु. ७००० पेक्षा अधिक किमतीची सवलत कुपने, १२ तनिष्का मासिकांचा कूपन संच, मधुरांगण ओळखपत्र 
प्ले स्टोअरवर जाऊन ‘मधुरांगण’ ॲप इनस्टॉल करूनही सभासद होता येईल. 
गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच हवे असेल, तर कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व व कुरिअर शुल्क ऑनलाइन भरावे. 
ॲपवरून नोंदणी करणाऱ्यांना भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील.
भेटवस्तू घेऊन जाण्यासाठी मोठी कॅरिबॅग आणणे आवश्‍यक 
संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Web Title: avdhoot gupte musical concert