पुण्यातून दिवसाला दहा कोटींचा गल्ला

पुण्यातून दिवसाला दहा कोटींचा गल्ला

पुणे -  जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘ॲव्हेंजर्स ः एण्ड गेम’ या चित्रपटाने पुणेकरांना चांगलीच भुरळ घातली असून, शहरात दिवसाला दहा कोटींचा गल्ला जमा होत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने तीस कोटींवर कमाई केली आहे.

शहरातील २५ मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये १०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात आहे. एका मल्टिप्लेक्‍समध्ये दिवसाला या चित्रपटाचे साधारणतः ११ शो होत आहेत. प्रत्येक मल्टिप्लेक्‍समध्ये किमान तीन ते चार, तर जास्तीत जास्त सहा स्क्रीन आहेत. किमान ९० ते जास्तीत जास्त ७०० आसनक्षमता असलेले हे स्क्रीन  आहेत. 

एका शोचे कमीत कमीत तिकीट २५० रुपये आहे. हे पाहिल्यानंतर २५ मल्टिप्लेक्‍समधील शंभर स्क्रीनवर हा चित्रपट सुरू आहे. यावरून हा चित्रपट दिवसाला दहा कोटींचा गल्ला कमवीत असल्याचे मल्टिप्लेक्‍सच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी (ता. २६) हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मध्यरात्री दीडपासून शो ठेवण्यात आले होते. मात्र, आता पहाटे आणि मध्यरात्रीचे शो बंद करण्यात आले आहेत. तरीही, पहिला शो सकाळी सात वाजता, तर शेवटचा शो रात्री अकरा वाजता आहे. पुढील दोन दिवसांच्या सर्व शोचे बुकिंग हाउसफुल्ल आहे. त्यामुळे चित्रपटाला एकूणच पुणेकरांचा दणक्‍यात प्रतिसाद आहे. 

आतापर्यंत चार मालिकांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पहिली मालिका २०१२ मध्ये प्रदर्शित झाली होती. या सर्व मालिकांना जगभरातील रसिकांचा प्रतिसाद मिळाला. आताच्या चौथ्या भागाचीही रसिकांना उत्कंठा लागून होती.

पुण्यात रसिकांचा प्रतिसाद पाहता ‘ॲव्हेंजर्स’ने बाहुबलीलाही मागे टाकले आहे. हीच परिस्थिती देशभर आहे. गेल्या काही वर्षांतील चित्रपटांच्या कमाईत बाहुबलीने रेकॉर्ड केले होते; मात्र हे रेकॉर्ड या चित्रपटाने तोडले आहे.  
-प्रकाश चाफळकर, भागीदार, सिटीप्राइड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com