पुणे विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांसाठी ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीचे दर्शन घडविणारी ही स्पर्धा मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाली. यामध्ये ४८ संघांची राज्यपातळीवर निवड करण्यात आली. 
विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड लागावी, यासाठी पुणे विद्यापीठाद्वारे ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यापीठस्तरीय फेरीचे उद्‌घाटन उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते झाले. या वेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आविष्कार नियोजन समितीचे सदस्य डॉ. मनीष वर्मा, डॉ. रवींद्र जायभाय, उपकुलसचिव एम. व्ही. रासवे या वेळी उपस्थित होते.

पुणे - ऊस लागवडीसाठी अत्याधुनिक यंत्र, रेल्वे अपघात टाळण्यासाठी सेन्सर, कांदा साठवणुकीसाठीची आधुनिक यंत्रणा, यांसह तंत्रज्ञान, सामाजिक सुधारणांची मॉडेल सादर करीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार सादर केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीचे दर्शन घडविणारी ही स्पर्धा मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाली. यामध्ये ४८ संघांची राज्यपातळीवर निवड करण्यात आली. 
विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड लागावी, यासाठी पुणे विद्यापीठाद्वारे ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यापीठस्तरीय फेरीचे उद्‌घाटन उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते झाले. या वेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आविष्कार नियोजन समितीचे सदस्य डॉ. मनीष वर्मा, डॉ. रवींद्र जायभाय, उपकुलसचिव एम. व्ही. रासवे या वेळी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'दादागिरी’त कोणाचे प्राबल्य?

या स्पर्धेसाठी ऑनलाइन चार हजार प्रस्ताव आले होते. त्यांची छाननी करून जिल्हा पातळीवर ९२० संघांची निवड करण्यात आली. तेथे झालेल्या स्पर्धेतून विद्यापीठस्तरीय फेरीसाठी २३७ संघ पात्र ठरले. आज त्यातील ४८ संघांची निवड राज्य पातळीवर केली. ही राज्यस्तरीय फेरी मुंबई येथे २९ ते ३१ जानेवारी यादरम्यान होणार आहे.

पुणे : वरिष्ठ लिपिकासह तिघावर लाच घेताना कारवाई 

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागृत व्हावी, यासाठी विज्ञान तंत्रज्ञान, औषधनिर्माण, कृषी व पशुसंवर्धन, भाषा आणि कला, व्यवस्थापन, विधी, वाणिज्य या विभागातून विद्यापीठाकडे प्रस्ताव मागविण्यात येतात. त्यातून विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यात साचणारे पाणी शोषून रस्ता दुरुस्ती लवकर करता येऊ शकते, याचेही सादरीकरण झाले. कमीत कमी खर्चात कांदा कसा साठवता येऊ शकतो, यांसह विविध प्रकारच्या कल्पनांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: avishkar competition planning for student by pune university