योग्य आहारातून हृदयविकार टाळा - डॉ. ज्योत्स्ना पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

‘हृदयविकार ही श्रुंखला व्याधी आहे. त्याची सुरवात एक-दोन दिवसांमध्ये नव्हे; तर कित्येक वर्षांपासून शरीरामध्ये झालेली असते. व्यायाम, योग्य आहार आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना हृदयविकारापासून दूर ठेवू शकते,’’ असे प्रतिपादन पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी केले.

पुणे - ‘हृदयविकार ही श्रुंखला व्याधी आहे. त्याची सुरवात एक-दोन दिवसांमध्ये नव्हे; तर कित्येक वर्षांपासून शरीरामध्ये झालेली असते. व्यायाम, योग्य आहार आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना हृदयविकारापासून दूर ठेवू शकते,’’ असे प्रतिपादन पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी केले.

ओंकारेश्वर देवस्थान योगोपचार केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये त्या बोलत होत्या. ‘हृदयरोग, मधुमेह नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर डॉ. पाटील यांनी  मार्गदर्शन केले. बारा वर्षांपासून विनाशस्त्रक्रिया हृदयरोग उपचार करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. अँजिओप्लास्टी व बायपास टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या साह्याने अत्याधुनिक ईसीपी; तसेच जर्मन तंत्रज्ञानावर आधारित एसएमआर या उपचारांचा कसा उपयोग होतो, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. या वेळी डॉ. पाटील यांच्या आरोग्यसेवेबद्दल ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी योग प्रशिक्षक वसंत कानडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid heart attacks by proper diet dr jyotsna patil