खासगी बसचालकांवर कारवाईसाठी टाळाटाळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांच्या मनमानीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. मात्र, त्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच बसचालकांविरुद्ध कारवाई होत नाही, असा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केला आहे. 

उन्हाळी सुट्या सुरू झाल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याचा फायदा घेऊन एसटी स्थानकांत जाऊन प्रवाशांना आकर्षित करणाऱ्या खासगी बसच्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. सुटीच्या काळात एसटीसह रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे खासगी बस चालकांनी तिकीटदरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. त्याकडे प्रशासन आणि आरटीओ दुर्लक्ष करीत आहे. पाठक म्हणाले, ""आरटीओच्या नियमानुसार खासगी बस वाहतूकदारांना प्रासंगिक करारावर प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. नियमाप्रमाणे प्रवाशांची यादी आरटीओकडून मंजूर करून घेणे आवश्‍यक आहे. परंतु, या नियमाकडे खासगी बसचालक दुर्लक्ष करीत आहेत. पुण्यातील अनेक बसस्थानकांबाहेर खासगी बसचालकांचे बुकिंग काउंटर आहेत. तर, अनेक ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीरपणे या बसेसचे पार्किंग केले जाते. खासगी बससेवेवर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नसल्याची शक्‍यता आहे. तसेच पोलिस आणि आरटीओ प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.'' 

Web Title: Avoiding private bus drivers for action