अवसरी-पेठ घाट मृत्यूचा सापळा (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील
रविवार, 22 एप्रिल 2018

एक किलोमीटर घाट रस्त्यावर संरक्षण कठडे नसल्याने धोका

मंचर (पुणे): खेड ते सिन्नर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे झालेले आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी पेठ घाट ते भोरवाडी या मार्गावरील एक किलो मीटर रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नाही. घाटामध्ये काही ठिकाणी अजूनही संरक्षण कठडे बसविले नाही. यामुळे हा परिसर अपघाताचे केंद्र बनला आहे.

एक किलोमीटर घाट रस्त्यावर संरक्षण कठडे नसल्याने धोका

मंचर (पुणे): खेड ते सिन्नर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे झालेले आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी पेठ घाट ते भोरवाडी या मार्गावरील एक किलो मीटर रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नाही. घाटामध्ये काही ठिकाणी अजूनही संरक्षण कठडे बसविले नाही. यामुळे हा परिसर अपघाताचे केंद्र बनला आहे.

15 दिवसांपूर्वी 200 फूट दरीत मोटार कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले. भोरवाडी येथे तर पुलाजवळ गेल्या तीन महिन्यांत 10 अपघातांची नोंद झाली आहे. 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, शेवाळवाडी, तांबडेमळा, निघोटवाडी, मंचर, एकलहरे, कळंब आदी गावांत अजूनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने भूसंपादनाच्या अडथळ्यामुळे सुमारे तीस किमी बाह्यवळण रस्त्याचे काम प्रलंबित आहे. पूर्वी जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर असलेल्या अवसरी-पेठ घाटातील धोकादायक वळणावर दर महिन्याला पाच ते सहा अपघात होत होते. अजून रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी कठडे बसवले नाहीत. त्यामुळे वीस दिवसांपूर्वी कार रस्ता सोडून थेट 200 फूट दरीत कोसळून जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर जाऊन थांबली. मंचरचे संगणक तज्ज्ञ अरविंद वाघ व त्यांचा मित्र वैभव वळसे पाटील दोघे जण गंभीर जखमी झाले. घाटाच्या जवळच असलेल्या भोरवाडी येथे चौपदरीकरण रस्त्याचे काम थांबले आहे. पुलाचे रुंदीकरणाचे काम लवकर झाल्यास अपघात टाळता येतील, असे भोरवाडी गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

चाकण, राजगुरुनगर, मंचर या जुन्या रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळते. रस्ते वाढत चालले तशी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी भेडसावणारच आहे. पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वरचेवर कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

 

1) तीन महिन्यात दहा अपघात
2) चार जणांचा मृत्यू
3) दहा जणांना अपंगत्व
4) दरीत मोटार कोसळून दोन गंभीर जखमी

वाहतूक खात्याचे दुर्लक्ष
सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीदेखील केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि त्यातच वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे महामार्गावर अपघातांची संख्या वरचेवर वाढत चालली आहे. ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्‍न आहे.

Web Title: avsari peth bhorwadi road accident center