पुरस्कार हा चांगल्या कार्यातील अल्पविश्रांतीसाठीचा सन्मान - सुनिल खळदकर

मिलिंद संधान
सोमवार, 11 जून 2018

नवी सांगवी ( पुणे ) - " पुरस्कार हा केवळ चांगल्या कार्यातील अल्पविश्रांतीसाठीचा सन्मान आहे. त्यानंतर अधिक जोमाने काम करीत प्रत्येकाने आपल्या कार्याचा आलेख उंचावला पाहिजे. " असे प्रतिपादन सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुनिल खळदकर यांनी पिंपळे गुरव येथे केले. काव्यमित्र संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन, राजमाता जिजाऊ स्मृती दिन व पर्यावरण दिनानिमित्त नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा गौरव, जीवन गौरव व उद्योगश्री पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी व्यासपिठावर प्राचार्य डी  ए सुर्यवंशी, सुकन बाफना, अजय घुले, चंद्रपुरचे तहसीलदार संजय बिरादार, अनिल वैद्य, राहुल शेटे उपस्थित होते. 

खळदकर म्हणाले, " सद्य स्थितीत महिलांनी राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आपल्या मुलांवर संस्कार केले तर अशी मुल भविष्यात राष्ट्राचे आदर्श नागरिक बनतील. त्यातूनच समाजात नितिमुल्ये रूजून गुन्हेगारीचा आलेख खाली येईल. त्यामुळे सेवाभावी संस्थांनी केवळ पुरस्कारापुरते मर्यादित न राहता महिला वर्गांकरीता कार्यशाळांचे नियोजनही करण्यात करावे. "

यावेळी कमलबाई हंबीर, सविता पाढेन, उज्वला चोरडिया यांना आदर्श माता पुरस्काराने गौरविले तर अजित सातकर, सुरेश खडके, तुकाराम धोत्रे, सुशील बियाणी, मिलिंद पांडे यांना उद्योगश्री पुरस्काराने सन्मानित केले. तसेच राज्यभरातून आलेल्या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक संतोश पाचपुते यांनी केले तर आभार संयोजक व संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी मानले.

Web Title: Award for the Best Work in the Program - Sunil Khaladkar