जुन्नरच्या यात्रेत तनिष्कांनी केले प्लॅस्टिक वापराच्या विरोधात जनजागरण            

दत्ता म्हसकर
गुरुवार, 19 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नर येथे बुधवारी (ता.18) सांयकाळी शिवाई देवी यात्रेच्या निमित्ताने पालखी मिरवणूक काढली होती. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक घटनांवर आधारित देखावे असणारे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.

जुन्नर (पुणे) : जुन्नर येथे बुधवारी (ता.18) सांयकाळी शिवाई देवी यात्रेच्या निमित्ताने पालखी मिरवणूक काढली होती. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक घटनांवर आधारित देखावे असणारे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.

या वर्षी जुन्नरच्या तनिष्का व्यासपीठ व तुळजाभवानी महिला प्रतिष्ठाणच्या वतीने 
प्लॅस्टिकचा भस्मासूर या ज्वलंत समस्येवर आधारित सामाजिक जनजागरण करणारा देखावा सादर करण्यात आला होता. प्लॅस्टिकच्या अती वापरामुळे होणारे दुष्परिणाम यात दाखविले होते. जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्यामुळे त्यांच्यावर भयानक मृत्यू ओढवला असल्याच्या घटना घडल्या आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या नदी नाल्यात अडकल्यामुळे जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही त्यामुळे धरणी मातेची सुपीकता कमी होत आहे. प्लॅस्टिक जाळल्यावर वातावरण प्रदूषित होते असे अनेक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. शुभदा शितल खरपुडे हीने भारत मातेची भूमिका साकार केली. व  बाळांनो ,एकच नियम पाळा, प्लॅस्टिकचा वापर टाळा. हा संदेश सर्वांना दिला. 

गटनेत्या उज्वला शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती मेहेर, शितल खरपुडे, स्वप्नजा मोरे, सरिता कडबोळ,मनीषा खेडकर आदी  तनिष्कानी हा चित्ररथ तयार करण्यात पुढाकार घेतला. 

Web Title: awareness about plastic use presented by tanishka group in yatra of junnar