'भीम अॅप'बाबत हवी जनजागृती 

रवींद्र जगधने 
रविवार, 18 मार्च 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉँच केलेल्या 'भीम अॅप' (भारत इंटरफेस फॉर मनी) सध्या दुर्लक्षित होत चालले आहे. त्यामुळे या अॅपबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप तयार केले असून गुगल प्ले-स्टोअरवरती ते उपलब्ध आहे.

पिंपरी (पुणे) - डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉँच केलेल्या 'भीम अॅप' (भारत इंटरफेस फॉर मनी) सध्या दुर्लक्षित होत चालले आहे. त्यामुळे या अॅपबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप तयार केले असून गुगल प्ले-स्टोअरवरती ते उपलब्ध आहे. डिजिटल व्यवहारासाठी सरकारी अॅप म्हणून ते लोकांच्या पसंतीला उतरले. मात्र, अनेकांना अॅपबाबत माहितीच नाही. सरकारी यंत्रणा, बँकांकडूनही अॅपबाबत जनजागृती केली जात नाही. त्यामुळे खासगी कंपन्यांचे विविध पेमेंट, व्हॉयलेट अॅप जाहिरातींच्या जोरावर अनेकांच्या मोबाईलमध्ये जागा मिळवत आहेत. 

भीम अॅप​बाबत...
- 10 दशलक्ष जणांकडून डाऊनलोड 
- आरटीजीएस व एनईएफटीप्रमाणे आर्थिक देवाणघेवाण प्रणाली 
- सहकारी बॅंकांसह एकूण 80 बॅंका उपलब्ध 
- मराठीसह तेरा भारतीय भाषेत उपलब्ध 
- छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना क्‍युआर कोडच्या माध्यमातून पैसे स्वीकारणे सोपे 
- स्वीकारलेले पैसे सरळ खात्यात जमा 
- पैसे पाठविण्यासाठी फक्त मोबाईल क्रमांक किंवा युपीआय आयडीची आवश्‍यकता 
- पैसे मागण्यासाठी विनंतीची सोय 
- आपल्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात काही वेळात पैसे पाठविण्याची सुविधा 
- व्यवहार डाऊनलोड करण्याची सुविधा 
- एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येतात. 
- आधार क्रमांकाच्या माध्यमातूनही बॅंक खात्यावर पैसे पाठविण्याची सुविधा 
- सरकारी कार्यालयांनाही पैसे स्वीकारण्यासाठी सोईस्कर 

सहकारी बँकांना फायदा 
अनेक सहकारी बँकांना ऑनलाईन बँकिंगसाठी स्वतःची वेबसाइट, अॅप नाही. अशा काही बॅँका भीम अॅपवरच आहेत. त्यांनी जनजागृती केल्यास त्यांच्या ग्राहकांनाही डिजिटल व्यवहार करता येतील. 

काय करायला हवे 
www.bhimupi.org.in या संकेतस्थळावर भीम अॅपबाबत माहिती फक्त इंग्रजीत दिली असून सदर संकेतस्थळ किमान हिंदीत तरी उपलब्ध करावे. अॅपबाबतची माहिती इतर भारतीय भाषेत द्यायला हवी. तसेच संकेतस्थळ कायम अद्ययावत ठेवावे. 
- सरकारने भीम अॅपबाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. 
- प्ले-स्टोअर व अॅपवर नोंदविलेल्या तक्रारी, सूचना व रँकिंगला गांर्भीयाने घ्यावे. 
- अॅपमध्ये अद्ययावत सुविधा द्याव्यात. 
- प्ले-स्टोअरवरील रँकिंगचा अभ्यास करण्याची गरज 
 

Web Title: awareness of bharat interface for money app