मधुमेह दिनानिमित्त जनजागृती अभियान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

जागतिक मधुमेह दिनानिमित्त सकाळ सोशल फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि एशियन आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे - जागतिक मधुमेह दिनानिमित्त सकाळ सोशल फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि एशियन आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ डॉ. श्रीरंग गोडबोले यांचे ‘मधुमेह समज-गैरसमज’ आणि डॉ. श्रुतिका कांकरिया यांचे ‘मधुमेह व नेत्र विकार’ या विषयावर व्याख्यान झाले.
त्याचबरोबर सकाळ सोशल फाउंडेशन, एशियन आय फाउंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ- निगडी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. डोळ्यांची प्राथमिक तपासणी, मोतीबिंदू - काचबिंदू आणि मधुमेह नेत्र तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरात ३५० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी ‘मधुमेह व नेत्र विकारा’वर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला पुण्यातील जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शाह हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. मधुमेहामुळे होणारे नेत्र विकार वेळीच ओळखून नियमित डोळ्यांची तपासणी केल्यास अंधत्व टाळता येते असे डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी या वेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness Campaign for Diabetes Day