esakal | लोहमार्गालगतच्या रहिवाशांची जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

sangvi

लोहमार्गालगतच्या रहिवाशांची जनजागृती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : लोहमार्ग ओलांडताना रेल्वेखाली सापडून मरण पावलेल्या व्यक्तींची संख्या दापोडी विभागात लक्षणीय आहे. याबाबत रेल्वेकडून सामाजिक खबरदारी घेण्यासंदर्भात नागरिकांसाठी सामाजिक अभियान राबविण्यात आले. दापोडी परिसरातून जाणाऱ्यालोहमार्गावर अनेक युवक, नागरिक मुले बसलेले असतात. गुलाबनगर, जयभीमनगर, सिद्धार्थनगर येथील नागरिक रेल्वे क्रॉसिंग करण्याचा उपयोग करतात. अनेक वेळा काही मुले पतंग किंवा इतर खेळ खेळताना दिसतात. अनेक मद्यपीमंडळी मद्यपान करतानाही आढळून आल्याने रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांनुसार दखल घेत पुणे आरपीएफच्या वतीने विभागीय सुरक्षा आयुक्त पुणे उदयसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी परिसरात लोहमार्ग भागातील नागरिक व वस्त्यांमधून अपघात थांबविण्यासाठी जनजागृती सामाजिक अभियान राबवण्यात आले.

यावेळी पुणे विभागीय रेल्वे बोर्ड समितीचे सदस्य विशाल वाळुंजकर म्हणाले, ‘‘रेल्वे प्रशासन व आरपीएफ यांच्या आवाहनाला सहकार्य करावे. लोहमार्गालगतच्या नागरिकांना जनजागृती करावी.’’ पुणे आरपीएफच्या वतीने अपघात रोखण्यासाठी केलेल्या अभियानात पुणे विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक एन. डी. खिरटकर, उपनिरीक्षक खडकी डी. एन. लाड, पुणे विभागीय रेल्वे कमिटी सदस्य विशाल वाळुंजकर, जितेंद्र महाजन, साईनाथ झंपले, रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष सिकंदर सूर्यवंशी, रवी कांबळे, रवी क्षीरसागर, बाबा शेख, संदीप तोरणे आदी उपस्थित होते.

अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी लोहमार्ग ओलांडताना पर्यायी पुलाचा किंवा फाटकाचा वाटप करावा. रेल्वे गाडीवर दगड व अन्य कोणत्याही वस्तू फेकून मारू नये जेणेकरून जीवितास धोका उत्पन्न होणार नाही. लोहमार्गावर बसणारे, थांबणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

- डी. एन. लाड, उपनिरीक्षक आरपीएफ

loading image
go to top