आंबेगाव-शिरूरमध्ये भीषण पाणी टंचाई

डी. के. वळसे पाटील 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

मंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर गावांमध्ये त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या सुरु कराव्यात.'' , अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली.
 
विधानभवन पुणे येथे सोमवारी (ता. १२) झालेल्या बैठकीला माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी जिल्हा युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, सभापती विश्वास आबा कोहकडे, माजी सभापती सुभाषराव मोरमारे, प्रमोद पर्हाड, बाबुराव साकोरे, सुधीरभाऊ पुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले, “सन १९७२ पेक्षाही दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. रब्बी पिक घेता आले नाही. खरीप हंगामातही पुरेशा प्रमाणात उत्पादन मिळाले नाही. चाऱ्याची सोय नसल्याने गुरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यात प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. वळसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनाबाबत म्हैसकर यांनी तातडीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आदेश दिले आहेत. 
 
२२ टँकरद्वारे पाणी द्या
पारगाव तर्फे खेड, तांबडेमळा, लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगाव पीर, मांदळेवाडी (ता.आंबेगाव), मिडगुलवाडी, केंदूर, पाबळ, खैरे नगर, कानुर मेसाई, हिवरे, खैरेवाडी, धामारी, मलठन, चिंचोली मोराची, सोने सांगवी, वाघाळे, शास्ताबाद (ता. शिरूर) आदी गावात तातडीने पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: awful water shortage in Ambegaon-Shirur