फिरोदिया करंडक : अयोध्या, कलम 370 विषयांवर बंदी

Ayodhya Article 370 and Hindu Muslim subjects have been banned in Firodiya Karandak
Ayodhya Article 370 and Hindu Muslim subjects have been banned in Firodiya Karandak

पुणे : फिरोदिया करंडक या स्पर्धेत नाटकांचे विषय निवडण्यावर संयोजकांनी निर्बंध आणले आहेत. राम जन्मभूमी-बाबरी मशिद, काश्‍मीर-370 कलम याशिवाय हिंदू-मुस्लिम यासंबंधीचे विषय एकांकिकांसाठी घ्यायचे नाहीत, असा नियम करण्यात आला आहे. यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून जाती-धर्मापलिकडील विषय स्पर्धकांनी घ्यावेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. 

फिरोदिया करंकड ही एकांकिकांसह विविध कलांसाठी घेण्यात येणारी स्पर्धा एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हौशी कलाकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी ही स्पर्धा आहे. त्यासाठी कोणते विषय निवडावेत, यावर बंधने घातल्याने त्याची समाजमाध्यमातून चर्चा सुरू झाली आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर कलाकृती सादर कराव्यात, यावरील निर्बंध घालणारी घटना महत्त्वाची आणि सूचकही आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

"तरुण मुलांनी त्यांना हव्या, त्या विषयावर व्यक्त व्हायचे नाही, तर कुणी व्हायचे? तरुणांच्या मनात खदखद असते, ती बाहेर येणारच. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलिस बघून घेतील. संयोजकांना नवीन विषयाची अपेक्षा असेल, तर त्यासाठी त्यांनी वेगळे पारितोषिक ठेवावे. विषय निवडला बंधन कशासाठी,'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

स्पर्धेच्या संयोजन मंडळाचे सदस्य अजिंक्‍य कुलकर्णी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, ""गेल्या अनेक वर्षांपासून जातीय विषयांवरच सादरीकरण केले जाते. गेल्या पाच वर्षांत त्यात वाढ झाली आहे. सध्याच्या वातावरण पाहता, समाजात कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच जाती-धर्मापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी विषय मांडले पाहिजेत. म्हणून आम्ही काही विषय निवडीवर बंधने घातली आहेत.'' 

तरुणांच्या अभिव्यक्तीवर कुठेही बंधने आणलेली नाही. जाती-धर्मापलीकडेही भोवताली असंख्य विषय असतात, स्पर्धेत नवे विषय यावेत, या विषयांतून त्यांनी व्यक्त व्हावे, असे संयोजकांचे मत आहे. या विषयांच्या मांडणीसाठी कोणतेही बंधन घातलेली नाही. 
- अजिंक्‍य कुलकर्णी (संयोजक)

विद्यार्थ्यांवर असे निर्बंध घालणे योग्य आहे का?

तुमचे मत webeditor@esakal.com या मेलआयडीवर पाठवा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com