कर्करोगाच्या समस्येवर आयुर्वेद प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

कर्करोगामुळे होणाऱ्या बद्धकोष्ठेतेच्या उपचारात आयुर्वेदातील औषध प्रभावी ठरते, या पुण्यातील ‘रसायू कॅन्सर क्‍लिनिक’मध्ये झालेल्या संशोधनावर जागतिक मोहोर उमटली. ‘युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल आँकॉलॉजी’ (इस्मो) या जागतिक परिषदेत या बाबतचा शोधनिबंध सादर करण्यात आला.

पुणे - कर्करोगामुळे होणाऱ्या बद्धकोष्ठेतेच्या उपचारात आयुर्वेदातील औषध प्रभावी ठरते, या पुण्यातील ‘रसायू कॅन्सर क्‍लिनिक’मध्ये झालेल्या संशोधनावर जागतिक मोहोर उमटली. ‘युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल आँकॉलॉजी’ (इस्मो) या जागतिक परिषदेत या बाबतचा शोधनिबंध सादर करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्करोगामुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर संशोधन करून विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधावरील हा शोधनिबंध ‘इस्मो’च्या इतिहासात प्रथमच प्रसिद्ध झाला. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑनलाइन पद्धतीने स्पेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या जागतिक कर्करोग परिषदेत रसायू कॅन्सर क्‍लिनिकचे वैद्य योगेश बेंडाळे यांनी हा शोधनिबंध सादर केला. परिषदेत सर्वाधिक भेट दिलेल्यांमध्ये याचा समावेश झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या संशोधनास मान्यता मिळाली. या संशोधन प्रकल्पात वैद्य विनीता बेंडाळे, वैद्य अविनाश कदम, वैद्य आनंदराव पाटील, वैद्य पूनम बिरारी गवांदे, वैद्य वैशाली धाराशिवे पाटील यांचा समावेश होता. 

पुण्यातील रेड लाइट एरियातही कोरोनाने केली एन्ट्री; 'इतक्या' जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

संशोधन
1) कर्करोगावर उपचारासाठी दिलेल्या औषधांमधून विशेषतः केमोथेरपीनंतर रुग्णाला बद्धकोष्ठता होते. तसेच कर्करोगाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या वेदनाशामक औषधांमुळेही ही बद्धकोष्ठता होण्याची शक्‍यता अधिक असते. 
2) कर्करुग्णांमधे सामान्यतः आढळणाऱ्या लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता हे तिसऱ्या क्रमांकाचे लक्षण आहे. कर्करोगाची गुंतागुंत वाढलेल्या रुग्णांचा त्रास यातून वाढतो. कर्करोगाच्या ५० ते ८७ टक्के रुग्णांना अशा प्रकारच्या बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो.
3) कर्करोग व्यवस्थापनातील अडथळा बद्धकोष्ठता हा कर्करोग व्यवस्थापनातील एक प्रमुख व मोठ्या प्रमाणावर आढळणारा अडथळा ठरत आहे. त्यामुळे कर्करोगाच्या पुढील उपचारांना उशीर होऊ शकतो. कर्करोगाचा शरिरात होणारा प्रसार थांबवणाऱ्या चिकित्सेलाही त्यातून मर्यादा पडतात. त्याचा थेट परिणाम कर्करोग व्यवस्थापनावर होतो. 
4) दररोज पोट साफ होण्यास आयुर्वेदाने महत्त्व दिले आहे. ते निरोगी माणसाचे लक्षण मानले आहे. मात्र, कर्करोगाच्या रुग्णांना आजारामुळे तसेच औषधांमुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यांना त्या त्रासातून सोडविण्याचा प्रभावी उपाय या संशोधनातून पुढे आला आहे.
5) पोटाचा, यकृताचा, स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी संबंधित बद्धकोष्ठतेवरही हे औषध गुणकारी ठरत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

Fight With Corona : प्लाझ्मा दान करून त्यांनी ५८ जणांना दिले जीवदान!​

संशोधनाचा उद्देश व निष्कर्ष 
औषध घेतलेल्या रुग्णांच्या बद्धकोष्ठतेच्या समस्येत लक्षणीय फरक पडतो, असे या संशोधनातून स्पष्ट झाले. बद्धकोष्ठतेवर या प्रभावी उपचारातून कर्करोगाच्या विविध टप्प्यातील रुग्णाचे जीवन सुसह्य झाले पाहिजे, हा या संशोधनामागचा उद्देश होता. 

दररोज पोट साफ होण्यास आयुर्वेदाने महत्त्व दिले आहे. ते निरोगी माणसाचे लक्षण मानले आहे. मात्र, कर्करोगाच्या रुग्णांना आजारामुळे तसेच औषधांमुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यांना त्या त्रासातून सोडविण्याचा प्रभावी उपाय या संशोधनातून पुढे आला आहे. 
- वैद्य योगेश बेंडाळे, रसायू कॅन्सर क्‍लिनिक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurveda is effective on the problem of cancer