रिक्षा संपाच्या विरोधात बाबा आढाव उतरले रस्त्यावर

pune.jpg
pune.jpg

पुणे : मंगळवारी होणाऱया रिक्षा राज्यव्यापी संपाला विरोध करण्यासाठी आज बाबा आढाव भर पावसात रस्त्यावर उतरले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील आंदोलनात आढाव सहभागी झाले. तसचे या वेळी रिक्षाचालकांवरील अन्यायकारी निर्णय रद्द करण्याची मागणी केली.

''सरकारच्या चुकलेल्या धोरणामुळे रिक्षाचालकांना आंदोलन करण्याची वेळे आली आहे. मात्र, आम्ही संपामध्ये सहभागी होणार नाहीत. असे रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा आढाव यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारने कॅब सेवा बंद करण्यात यावी, रिक्षाची भाडेवाढ लवकर करण्यात यावी, या मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. असेही ते म्हणाले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांची भेट घेत प्रादेशिक परिवहन अधिकीरी आनंद पाटील यांनी त्यांचे निवेदन स्विकारले.

रिक्षाचालकांच्या मागण्या
- रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे
- खुला रिक्षा परवाना बंद करा, त्वरित रिक्षा भाडेवाढ करा
- बेकायदा कॅब बंद करा, रिक्षा पासिंगमधील अडचणी दूर करा
- शहरातील वाहन संख्या नियंत्रणात ठेवा
- रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे खुला रिक्षा परवाना बंद करा
-  त्वरित रिक्षा भाडेवाढ करा
- बेकायदा कॅब बंद करा, रिक्षा पासिंगमधील अडचणी दूर करा
 -शहरातील वाहन संख्या नियंत्रणात ठेवा

या संघटना झाल्या सहभागी
- रिक्षा पंचायत
- आप रिक्षा संघटना
- पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघटना
- रिपब्लिकन वाहतूक संघटना
- क्रांती रिक्षा सेना


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com