श्री बाबाजी चैतन्य महाराजाच्या पालखीचे प्रस्थान

पराग जगताप
गुरुवार, 5 जुलै 2018

ओतूर (पुणे) : ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरीच्या मंत्रघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (ता.4) ओतूर येथून पंढरपूरला वारीसाठी प्रस्थान झाले.

ओतूर (पुणे) : ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरीच्या मंत्रघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (ता.4) ओतूर येथून पंढरपूरला वारीसाठी प्रस्थान झाले.

जुन्नर, आंबेगाव व खेड या तीन तालुक्यातील वारकर्यानी संघटित करुन स्थापन केलेल्या श्री बाबाजी चैतन्य महाराज सेवा मंडळ वारकरी समाज या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या पालखी सोहळ्याचे 58 वे वर्ष आहे. बुधवारी सकाळी उदापूर ता.जुन्नर येथून चैतन्य रथ मिरवणूकिने ओतूरला समाधी स्थळापर्यंत आणण्यात आला त्यानंतर गंगास्नान झाल्या नंतर सामुहिक आरती झाली व विठ्ठल महाराज मांडेच्या हस्ते चैतन्यांचा चांदीचा मुखवटा व पादुका विधिवत पणे पालखीत ठेवण्यात आल्या. यावेळी चैतन्य महाराज मठ बांधकाम समिती अध्यक्ष लक्ष्मण शेरकर, दिंडी सोहळा अध्यक्ष ज्ञानेश्वर कबाडी, धोंडिभाऊ पिंगट, कोंडाजी बाबा आश्रम अध्यक्ष किसन मेहेर, उत्तम भगत, उद्योजक बी.व्ही.मांडे, शरद चौधरी, दत्तात्रय कुलवडे, शंकर ढवळे, रमेश ढवळे, विणेकरी मारुती गाढवे, सखाराम बोचरे, श्रीहरी शिंदे, मल्हारी नायकोडी, चैतन्य महाराज दिंडी सोहळा व कोंडाजी बाबा डेरे आश्रम सर्व विश्वस्त व जुन्नर आंबेगाव व खेड तालुक्यातील वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

ओतूर गावातील अनिल तांबे, विनायक तांबे, गंगाराम डुंबरे, सरपंच बाळासाहेब घुले यानी दिंडीचे स्वागत केले. पालखी अळकुटी, बेलवंडी, श्रीगोंदामार्गे शनिवार (ता.21) जुलै श्री क्षेत्र पंढरपूरामध्ये प्रवेश करेल. येथे पालखीचा मुक्काम श्री बाबाजी चैतन्य महाराज मठात आठवडाभर राहणार आहे. या पालखी सोहळ्याला रथाला बैल जोडीचा मान उदापूर गावाला असतो. यावेळी गणेश महाराज शिंदे यांच्या बैल जोडीला तो मिळाला आहे. 

श्री चैतन्य महाराज मठ बांधकाम समिती अध्यक्ष लक्ष्मण शेरकर व दिंडी सोहळा अध्यक्ष ज्ञानेश्वर कबाडी म्हणाले की, ओतूर येथे श्री बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी आहे. कै. कोंडाजीबाबा डेरे व कै. सहादूबाबा वायकर यांनी सुरु केलेल्या या पालखीला मानाचे स्थान आहे.पंढरपुर येथे मठाचे बांधकाम चालु असुन नागरीकानी त्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: babaji maharaj palakhi s arrival from otur