मनाचिये वारी : वारकऱ्यांची मनवारी अखंड सुरूच

babanrao pachpute.jpg
babanrao pachpute.jpg

Wari 2020 : जाता पंढरीसी सुख वाटे जिवा, हे पंढरीचे माहात्म्य आहे. पंढरीच्या वाटेवर चालताना वारकरी कितीही थकला, तरी देवासाठी पाय दुखले, असे म्हणून तो आनंदाने ते दुःख सहन करतो. अठरा- वीस दिवसांची अखंड वाटचाल करतो. त्यामध्ये देवाच्या नामस्मरणामुळे तो अखंड भगवंताच्या जवळ असतो. वारी ही म्हणाल तर सोपी आणि म्हणाल अवघड साधना आहे. वारकरी काही मागण्यासाठी देवाकडे येत नाहीत. देवाच्या नामस्मरणात संतांच्या संगतीत त्याला आनंद मिळत असतो. पिढ्यान्‌पिढ्या वारकरी पंढरीची वारी केवळ आत्मानंदासाठी करतात.

संतसंग हा वारीतील आत्मा असतो. देवाकडे जाताना संतांची संगत असली, तरच अपेक्षित दर्शनाची प्राप्ती होत असते. मात्र, यंदा चीनपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने साऱ्या विश्‍वाला ग्रासले आहे. त्याचा परिणाम यंदा हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीवरही झाला आहे. कधीही वारी न चुकविणारा वारकरी सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे घरी बसला आहे. तो घरी असला, तरी त्याचे मन मात्र वारीच्या वाटेवर आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने तो अधिक घातक आहे. मात्र, वारकरी संप्रदायाने कायम सामाजिक भान राखून भूमिका बजावली आहे.

वारीत गेल्यावर तो संसार सोडत असतो, तो देवाशी एकरूप होत असतो. वारी हा देवाकडे जाणारा राजमार्ग आहे. वारी हा उत्सव आहे. पंधरा वर्षे मी वारी करत आहे. शरीराने नसलो तरी आम्ही मनाने वारीच्या वाटेवर आहोत. जगावरचे संकट लवकर दूर करून किमान कार्तिकी वारी आम्हाला करू दे, असे मागणे पंढरीच्या विठुरायाकडे मागणार आहे.

(शब्दांकन : शंकर टेमघरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com