महामानवाच्या स्पर्शाची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाला भेट देण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांचे आवडते व्हायोलिन, डोळे उघडे ठेवून जगाकडे पाहणारी बुद्धाची मूर्ती, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू अशा अनेक गोष्टी वारसा दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना पाहता आल्या.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पलंगावर अखेरचा श्‍वास घेतला तो पलंग, ज्या खुर्चीवर बसून राज्यघटना लिहिली ती खुर्ची, अशा वस्तू पाहताना वारसाप्रेमींना महामानवाच्या स्पर्शाची अनुभूती आली.

‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाला भेट देण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांचे आवडते व्हायोलिन, डोळे उघडे ठेवून जगाकडे पाहणारी बुद्धाची मूर्ती, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू अशा अनेक गोष्टी वारसा दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना पाहता आल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘भारतरत्न’चे पदक, त्यांचा अस्थी कलश, त्यांचा जीवनप्रवास दाखविणारी शेकडो छायाचित्रे पाहताना सर्व जण भारावून गेले. संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार यांनी स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील बावन्न देशांची सांस्कृतिक माहिती सांगणाऱ्या प्रदर्शनास भेट दिली. वसंत जोशी आणि सूरज पाटील यांनी सर्वांना माहिती सांगितली.

इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले, ‘‘मुजुमदार दांपत्याच्या पुढाकाराने निर्माण झालेले जागतिक दर्जाचे संग्रहालय म्हणजे पुणे शहराचे भूषण आहे.’

Web Title: Babasaheb Ambedkar Musium Varsa Darshan