पाटबंधारेसह महापालिकेला जाग

उरुळी कांचन (ता. हवेली) - पांढरस्थळ येथून डाळिंब बनात जाण्यासाठी बेबी कालव्यावर तयार करण्यात आलेल्या पुलासाठी वापरलेल्या छोट्या पाइपमुळे तुंबलेले पाणी.
उरुळी कांचन (ता. हवेली) - पांढरस्थळ येथून डाळिंब बनात जाण्यासाठी बेबी कालव्यावर तयार करण्यात आलेल्या पुलासाठी वापरलेल्या छोट्या पाइपमुळे तुंबलेले पाणी.

उरुळी कांचन - पूर्व हवेलीत बेबी कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याबाबत ‘टोलवाटोलवीने फुटणार कालवा?’ असे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची तातडीने दखल घेत खडकवासला पाटबंधारे व पुणे महापालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी ४० टक्‍क्‍यांनी तत्काळ कमी केली आहे.  

कालवा फुटीसाठी सर्वांत मोठा धोका हा कालव्याच्या अस्तरीकरणाची झालेली दुरवस्था, कालव्यातील जलपर्णी व काही पूल आहे. हे अडथळे दूर करणे गरजेचे आहे. मात्र, केवळ कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याची पातळी कमी करणे, ही बाब चुकीची आहे. याबाबत पाटबंधारे खात्याने हालचाली न केल्यास पूर्व हवेलीत आंदोलन उभारण्याचा इशारा लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.

याबाबत कुंजीरवाडीच्या सरपंच अनुराधा संतोष कुंजीर म्हणाल्या, ‘‘हवेली व दौंड तालुक्‍यातील हजारो एकर शेतीसाठी पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील शुद्ध केलेले सांडपाणी मुंढवा जॅकवेलच्या मदतीने बेबी कालव्यात सोडले जाते, ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची आहे. मात्र, कालव्याचे अस्तरीकरण ढिसाळ व पोकळ झाल्याने लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन व बोरीऐंदी भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यातच कालव्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी व इतर गवत उगवले आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सलग वाहत नाही. याचा फटका कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना बसला आहे. 

कुंजीरवाडी व उरुळी कांचन हद्दीतील काही लोकवस्तीत पाणी शिरल्याने घरे पडण्याची भीती निर्माण झाली आहे.’

कालवा फुटीसाठीच्या धोक्‍याला कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीपेक्षा पाणी वाहतुकीला अडथळे घटक कारणीभूत ठरतील, हा शेतकऱ्यांचा आरोप मान्य आहे. यातून तातडीने मार्ग काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत जेसीबीच्या मदतीने जलपर्णी व इतर गवत काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी यापुढील काळात तातडीने पावले उचलण्यात येतील. शेतकऱ्यांनीही आपापल्या हद्दीतील अडचणीची माहिती पाटबंधारे खात्याला द्यावी. 
 - पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

रायवाडी, कुंजीरवाडी (आळंदी म्हातोबाची येथे जाणारा रस्ता), उरुळी कांचन हद्दीत पांढरस्थळा अशा अनेक ठिकाणी कालव्यावरून जाण्यासाठी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, या रस्त्याच्या खाली पाणी जाण्यासाठी छोट्या आकाराचे पाइप असल्याने पाणी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.
 - सुनील बबन काळभोर, शेतकरी लोणी काळभोर- रायवाडी (ता. हवेली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com