#MonsoonTourism नाणेघाट - रेलिंगची झालेली दुरवस्था

मीननाथ पानसरे, आपटाळे 
बुधवार, 20 जून 2018

जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून नुकताच सरकारने घोषित केला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नाणेघाट, दाऱ्याघाट, माळशेज घाट, आंबे हातविज, दुर्गावाडी ही स्थळे वर्षाविहारासाठी पर्यटकांना खुणावत असतात. 

माळशेज घाट सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटनासाठी धोकादायक होत चालला आहे. घाटामध्ये दरडी कोसळून अपघात होणे, दाट धुक्‍यामुळे वाहनाचे अपघात होऊन दरीत वाहने कोसळलेल्या आहेत. 

जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून नुकताच सरकारने घोषित केला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नाणेघाट, दाऱ्याघाट, माळशेज घाट, आंबे हातविज, दुर्गावाडी ही स्थळे वर्षाविहारासाठी पर्यटकांना खुणावत असतात. 

माळशेज घाट सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटनासाठी धोकादायक होत चालला आहे. घाटामध्ये दरडी कोसळून अपघात होणे, दाट धुक्‍यामुळे वाहनाचे अपघात होऊन दरीत वाहने कोसळलेल्या आहेत. 

नाणेघाटात पर्यटकांनी सुरक्षितता न बाळगल्यास येथील धोकादायक ठिकाणे जीवघेणी ठरू शकतात. नाणेघाटाजवळील नानाच्या अंगठ्याच्या पायथ्याशी असलेल्या दरीलगत संरक्षक कठडे (रेलिंग) बसविण्यात आलेले आहेत. मात्र, त्यांची उंची अत्यंत तोकडी असल्याने धोकादायक आहे. या ठिकाणी धुक्‍यात रेलिंग दिसून येत नाही. या ठिकाणी पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. त्यातून एखादी अनुचित घटना घडण्याची शक्‍यता आहे. नानाच्या अंगठ्याच्या मध्यभागी कडेला एक झाड असून, त्या ठिकाणी फोटोसेशन करण्याचा आग्रह पर्यटकांकडून होतो. मात्र, या ठिकाणावरून दरी असल्याने व कोणतीही सुरक्षा नसल्याने हे ठिकाणही धोकादायक झाले आहे.

नानाच्या अंगठ्यावर वाऱ्याचा वेग बेसुमार असल्याने तोल जाऊन दुर्घटना घडू शकते. येथे ठिकठिकाणी निवारा शेड (पॅगोडे) उभारलेले आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात त्याचे पत्रे उडाले. येथील गुफेजवळ दरड कोसळण्याची भीती आहे. नाणेघाट परिसरात ब्रिटिश काळापासून पोलिस चौकी आहे. मात्र, सध्या ही चौकी फक्त कागदावरच कार्यरत आहे. या परिसरात मोबाईलला रेंजच नसल्याने संपर्क करण्यात अडथळा निर्माण होतो. दुर्घटना घडल्यास मदतकार्यासाठी तातडीने संपर्क करणे जिकिरीचे होत आहे.

दाऱ्याघाटाच्या टोकावर जाण्यासाठी पायवाट आहे. पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्यामुळे टोकापर्यंत पोचणे मुश्‍कील होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. येथील धबधब्याजवळ डोंगरावरून पाण्याबरोबर दगड वाहून येत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे. इंगळूण घाटामध्ये पावसाळ्यात दगडी कोसळून रस्ते खचण्याचे प्रकार घडलेले आहेत. दुर्गाडी किल्ला, दुर्गादेवी मंदिर व पठारी भाग आदी ठिकाणे येथे आहेत. येथे वन विभागाने रेलिंग केले आहेत. 

ठिकठिकाणी मदत केंद्रे उभारा
नानाच्या अंगठ्याच्या परिसरात वन विभागाने संरक्षक कठडे बसविणे गरजेचे आहेत. मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणाहून जंगलातून वाट काढत नाणेघाट सर करणाऱ्या पर्यटकांसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. 

Web Title: bad condition of railaing in naneghat