खड्ड्यांमुळे रोटीघाट रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पाटस - पाटस ते बारामती रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रोटीच्या नागमोडी घाटातील रस्ता अवघ्या चार महिन्यांत पुन्हा उखडला आहे. घाटातील अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

मागील अनेक वर्षांपासून पाटस ते बारामती रस्त्यावर वासुंदे (गुंजखिळा)पर्यंत रस्त्याची खड्डे पडल्याने दुरवस्था झाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी निधी उपलब्ध केल्याने या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मार्गी लागले. मात्र, एक वर्षाच्या आतच या रस्त्यावर खड्डे पडल्याने दुरवस्था झाली होती. संत तुकाराम महाराज पालखीच्या आगमनापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्ती केली होती. मात्र, अवघ्या चार ते पाच महिन्यांच्या आतच या रस्त्यावर खड्डे पडू लागले असून, डांबरीकरण उखडू लागले आहे. संबंधित ठेकेदाराने काम निकृष्ट पद्धतीने केल्यानेच या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.

यंदा तालुक्‍यात मोठा पाऊस झाला नसतानाही या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून, रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Bad condition of road in Rotighat