रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून प्रशासनाचा उरुळी कांचन येथे निषेध 

जनार्दन दांडगे
Wednesday, 14 October 2020

-उरुळी कांचन परीसरातील रस्त्यांची लागली वाट 

-रस्त्यातील खड्ड्यात स्थानिक युवकांच्याकडून झाडे लावून प्रशासनाचा निषेध.

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन शहरात येणारे व शहरातून आसपासच्या गावात जाणाऱ्या सर्वच रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून, उरुळी कांचन परीसरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना वाहन चालवताना खड्डे वाचवत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

दरम्यान उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापुर महामार्ग ते तुपेवस्ती मार्गे रेल्वेस्टेशन या गावाअंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी तुपे वस्ती परीसरातील पंचवीसहून अधिक युवकांनी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन अनोखे आंदोलन केले. तर भारतीय जनता पक्षाचे अंजिक्य कांचन यांनी, उरुळी कांचन शहरात येणारे व शहरातुन आसपासच्या गावात जाणाऱ्या सर्वच रस्त्यांची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी केली आहे. 

पुणे-सोलापुर महामार्गावरील उरुळी कांचन ही व्यापारी दृष्ट्रीने महत्वाची ग्रामपंचायत आहे. पुरंदर, दौंड, शिरुरसह पुर्व हवेलीमधील किमान पंचविसहुन अधिक गावातील लोकांचा राबता उरुळी कांचन येथे असतो. मात्र भवरापुर, टिळेकरवाडी, कोरेगाव मुळ, जेजुरी रस्ता या सारख्या उरुळी कांचन शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था सध्या चिंताजणक बनली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, नागरीकांना रस्त्यातून वहान चालवणे तरच दुरच पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक असल्याने, रस्त्यांच्या कामाबाबत प्रशासकाकडुन नागरीकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नसल्याने नागरीकांची अवस्था कठीण बनली आहे.

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

दरम्यान मागील दोन दिवसांपासून उरुळी कांचन व परीसरात पाऊस सुरु झाल्याने, खड्ड्यात पाणी साचल्याने नागरीकांची अवस्था आनखीनच कठीन बनली आहे. पुणे-सोलापुर महामार्ग ते तुपेवस्ती मार्गे रेल्वेस्टेशन या गावाअंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेला कंटाळलेल्या अलंकार पाटील , किरण तुपे, शुभम तुपे, आशुतोष तुपे, नितीन तुपे, मनोज तुपे, रोहित तुपे, अतुल मोरे, मंगेश ढमढेरे, अनिकेत कोलते,किशोर तुपे,समीर रेवडकर, चंद्रकांत कोलते,कुणाल कांबळे यांनी आज (बुधवारी) दुपारी खड्ड्यात झाडे लावुन प्रशासनाचे लक्ष वेधुन घेतले.

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad condition of roads in Uruli Kanchan city