...तर वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल

निलेश कांकरिया
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

वाघोली : आरोग्याचा प्रश्न निर्माण होणाऱ्या कचऱ्यासारख्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यापेक्षा सदस्य राजकारण करून बैठकीला उपस्थित राहत नसतील तर वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल. असा सूर नागरिक व नेटिझन्स काढू लागले आहे. तर वाघोलीचा महापालिकेत समावेश करावा अशी मागणी हवेली शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे केली जाणार आहे.

वाघोली : आरोग्याचा प्रश्न निर्माण होणाऱ्या कचऱ्यासारख्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यापेक्षा सदस्य राजकारण करून बैठकीला उपस्थित राहत नसतील तर वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल. असा सूर नागरिक व नेटिझन्स काढू लागले आहे. तर वाघोलीचा महापालिकेत समावेश करावा अशी मागणी हवेली शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे केली जाणार आहे.

वाघोलीतील सध्याच्या कचरा डेपोत कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने कचरा टाकण्यास जागा नाही. यामुळे मागील महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. कचरा उचलला ही जात नाही व घंटा गाड्या द्वारे गोळा ही केला जात नाही. यामुळे सार्वजनिक ठिकानाबरोबरच घरात ही कचऱ्याचे ढीग साचू लागले आहे. कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन तीन आठवड्यापूर्वी करण्यात आले होते. 

मात्र त्या बैठकीला 18 पैकी नऊ सदस्यांनी दांडी मारली. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. यासाठी विशेष ग्रामसभा ही घेण्यात आली. त्यामध्ये आहे त्या डेपो जवळ कचरा टाकावा असा ठराव करण्यात आला. मात्र अतिक्रमणामुळे तेथेही जागा नसल्याने प्रश्न सुटला नाही. यासाठी शुक्रवारी सदस्यांची पुन्हा तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र त्यालाही नऊ सदस्यांनी पुन्हा दांडी मारली. याबाबत नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

त्यांच्या कचऱ्याचे नियोजन करणे हे प्रत्येक सोसायटीला बंधनकारक आहे. त्या आधारेच बांधकाम परवाना दिला जातो. मात्र सोसायटी ते करीत नाही. पी एम आर डी ए ने त्याचीही पाहणी केली पाहिजे.
- चंद्रकांत वारघडे, माहिती सेवा समिती

सदस्यांच्या राजकारणात कचरा प्रश्न अडकला आहे. सर्वत्र कचरा साठला असून आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. गाव तस चांगलं पण वेशीला टांगल. अशी अवस्था निर्माण झाली आहे. यासाठीच महापालिकेत वाघोलीचा समावेश करावा अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहे. 
- राजेंद्र पायगुडे, हवेली तालुका प्रमुख, शिवसेना.

‎ग्रामपंचायत सदस्य जबाबदारी पासून दूर पळत आहेत, कचरा उत्पन्न देतो हे ही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
- टी. सातव, नागरिक.

एवढ्या गंभीर प्रश्नाच्या बैठकीसाठी सदस्य अशा प्रकारे राजकारण करून अनुपस्तीत राहत असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. सरपंचांनी त्यांच्या अधिकारात निर्णय घेऊन प्रश्न सोडवावा.
- राजेंद्र सातव, माजी उपसरपंच. 

Web Title: bad luck for Wagholi