इतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

इथली शिस्त आणि व्यवस्था ज्याप्रमाणे चोख केलीये, ते मला विशेष आवडलं. ही रन खास पुणेकरांसाठी आणि भारतीय खेळाडूंसाठी आहे. - मुक्ता टिळक, महापौर 

पुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत पुणेकर, खेळाडू, आर्मी, राजकीय नेते अशा सर्वांनीच सहभाग घेतला. त्यांचे काही अनुभव त्यांनी 'सकाळ' सोबत शेअर केलेत...

मुक्ता टिळक, महापौर -
पुणे हाफ मॅरेथॉनचं उत्साही वातावरण बघून खूप छान वाटलं. आजकाल आपल्या सगळ्यांच्या दिवसभराच्या कामाच्या नियोजनांमुळे सगळी फॅमिली एकत्र बघायला मिळत नाही. पण येथील फॅमिली रनमुळे फॅमिली ला एकत्र येण्याची संधी मिळाली. इथली शिस्त आणि व्यवस्था ज्याप्रमाणे चोख केलीये, ते मला विशेष आवडलं. ही रन खास पुणेकरांसाठी आणि भारतीय खेळाडूंसाठी आहे.

गिरीश बापट, पालकमंत्री -
अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लोकांमध्ये पळण्याची संस्कृती रुजतेय आणि ती या मॅरेथॉनमधून आज दिसून आली. कुठलंही मोठं काम यशस्वी व्हायला टीमवर्क लागतं, जे उत्तमप्रकारे येथे झालंय. हेच या मॅरेथॉनचं यश आहे. इतकी भव्य मॅरेथॉन पुण्यात पहिल्यांदाच झालीय.

प्रतापराव पवार, सकाळ समूहाचे अध्यक्ष -
लहान मुलांना, लोकांना जर चांगलं वातावरण दिलं तर ते चांगल्या गोष्टीसाठी आनंदाने सहभागी होतात. हे या मॅरेथॉनमधून सिध्द झालंय. पुण्यातून सर्वच स्तरातून पुणे हाफ मॅरेथॉनच्या नियोजनासाठी मदत झाली. आनंद विकत मिळत नाही. तो आनंद 'सकाळ' या मॅरेथॉनच्या माध्यमातून लोकांना देऊ शकला, याचे समाधान आहे. 

अनिल शिरोळे, खासदार -
आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर धावणं खूप गरजेचं आहे. पुणे हाफ मॅरेथॉनद्वारे ही गरज पुर्ण होण्यासाठी प्राधान्य मिळालं. असा रनसाठी पुणेकरांनी दिलेला प्रतिसादही अफाट होता. 

सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को. सोसायटी -
आजकाल आपली दैनंदिनी खुप धावपळीची झाली आहे, त्यामुळे कुणाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळच उरला नाही. पण पुणे हाफ मॅरेथॉन सारखे उपक्रम आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी देतं. असे उपक्रम नेहमीच व्हावे. 

मोनालीसा बागल, अभिनेत्री -
स्वतःसाठी वेळ देण्यासाठी सकाळ आणि बजाज आलियान्झ चा हा उपक्रम चांगले निमित्त आहे. आपण सोशल मीडियाच्या खूप आहारी गेले आहोत. ज्यामुळे आपले लक्ष आपल्या तब्येतीवर नसतेच. सोशल मीडिया साठी आपण तासन तास घालवू शकतो तर स्वतःच्या चांगल्या आरोग्यासाठी या मॅरेथॉन मध्ये पंधरा मिनीट धावू शकतोच. असे रोज रनिंगचे पंधरा मिनिट आपल्या आरोग्याच्या फायद्याचे आहेत.

भाग्यश्री मोटे, अभिनेत्री -
फिटनेस हा आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालू शकत नाही. त्यातल्या त्यात रनिंग ही सहज फॉलो करण्याची गोष्ट आहे. पुणे हाफ मॅरेथॉन मध्ये येऊन माझ्या एनर्जीत आणखीणच भर पडली. पहिल्याच सकाळ प्रस्तूत मॅरेथॉन ला इतका प्रतिसाद बघून फ्रेश वाटतंय.

मानसिंग, ट्रेनी, आर्मी इनस्टिट्यूट, घोरपडी -
लहान मुलांनाही या मॅरेथॉनमध्ये सामिल करुन घेतले ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यामुळे त्यांच्यात रनिंग बद्द्ल जागृकता निर्माण होईल. माझी मॅरेथॉनसाठीची तयारी पुर्ण झाली नव्हती. तरी येथील व्यवस्था आणि वातावरण बघून जो उत्साह आला त्यामुळे मला चांगले धावता आले. 

मनिषा साळुंके, पुणे हाफ मॅरेथॉन (पहिली विजेती, महिला कॅटेगरी) -
सकाळ आणि पुणे अलियान्ने मॅरेथॉनचा केलेला हा पहिला उपक्रमच खुप कौतुकास्पद आहे. खेळाडूंना अशाप्रकारचे प्रोत्साहन नेहमी मिळत राहणे गरजेचे असते. या मॅरेथॉनमध्ये धावताना पुणेकरांनी दिलेले प्रोत्साहन उत्साहवर्धक ठरले.

Web Title: Bajaj Allianz Pune Half Marathon Participants Experience