प्लास्टर पॅरीस गणेश मुर्त्यांवर बंदी आणावी - बजरंग दल

रमेश मोरे
शनिवार, 21 जुलै 2018

जुनी सांगवी (पुणे) : पर्यावरण वाचविण्यासाठी प्लास्टीक पिशवी बंदी सारखीच गणेश उत्सवासाठी पर्यावरणपुरक उत्सव साजरा करण्यासाठी प्लास्टर पॅरीसच्या मुर्त्यांवर बंदी आणावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर बजरंग दलाच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मूर्ती व्यावसाईक मु्र्ती कामाला लागण्याआधी यावर उपाय योजना केल्यास व्यावसाईकांचे नुकसान होणार नाही. शहरातील मुर्ती व्यावसाईकांची यादी तयार करावी. शहरात बाहेरून येणाऱ्या मूर्त्या व त्यांच्या ठिकाणांचा शोध घेऊन पी.ओ.पीच्या किंमतीत शाडु मातीच्या मुर्ती उपलब्ध होतील का याची उपाय योजना करावी. शाडुच्या मुर्तींची किंमत कमी करणे तसेच शाडु मुर्तीच्या विक्रीला चालना देण्यासाठी उपक्रम राबवावेत.

शहरात विविध ठिकाणी याचे जनतेत प्रबोधन करावे.पी.ओ.पी.च्या मुर्त्यांवर शंभर टक्के बंदी घालणे शक्य न झाल्यास नदीप्रदुषण रोखण्यासाठी अशा मुर्ती नदीच़्या पाण्यात विसर्जित होणार नाहीत याची काळजी घ्यावी.शहरातील अनधिकृत स्टॉल धारकांवर प्रशासनाने लक्ष ठेवावे. शाडु मुर्ती व्यावसाईक स्टॉल धारकांना सवलत देवुन त्यांना मोक्याच्या ठिकाणी जागा द्याव्यात."मुर्ती आमची किंमत तुमची,सारख्या उपक्रमांना पाठबळ देवुन स्थानिक कारागीरांना बाजारपेठ मिळवुन द्यावी.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तांसह पर्यावरण विभाग, महापौर यांना निवेदन देण़्यात आले आहे.पिंपरी चिंचवड शहर संयोजक कुणाल साठे, पराग ढोरे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Web Title: bajarang dal demand to ban plaster statues