बेशिस्तीचा बाजीराव रस्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

पुणे - स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणारा आणि वाहतुकीची नेहमी कोंडी असणारा बाजीराव रस्ता हा बेशिस्त वाहतुकीची ओळख बनला आहे. अप्पा बळवंत चौक ते शनिवारवाडा या दरम्यान तर वाहतूक नियम लागू नसल्यासारखी स्थिती आहे. चौक परिसरात दंडवसुलीसाठी पोलिस उभे असतात. पुढे मात्र वाहनचालकांकडून नियम सर्रास पायदळी तुडविले जातात. 

पार्किंगसाठी आखलेल्या पांढऱ्या पट्ट्याबाहेर वाहने लावली जातात. चारचाकी वाहने तर रस्त्यातच उभी असतात. अप्पा बळवंत चौक ते शनिवारवाडा या रस्त्यालगत विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने आहेत. त्या दुकानांसाठी माल पोचविणारी वाहनेही रस्त्यावर उभी असतात. तीदेखील कोंडीला कारणीभूत ठरतात.

लाल महाल आणि महापालिकेकडून शनिवारवाड्याच्या मागील बाजूस वळणारी वाहने थेट उलट दिशेने दक्षिणमुखी मारुतीच्या दिशेने जातात. वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होत नाही. अप्पा बळवंत चौकाकडून येणारी वाहने आणि दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अपघातही होतात. वाहतूक पोलिसांचे मात्र याकडे  दुर्लक्ष आहे.

फलकांकडेही दुर्लक्ष
अप्पा बळवंत चौक ते शनिवारवाडा या परिसरात अनेक ठिकाणी शंभर मीटर परिसरात वाहने उभी करू नयेत, असे फलक लावलेले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चारचाकी आणि दुचाकी वाहने बेशिस्तीने उभी केली जातात. एरवी अन्य परिसरात बेशिस्तीने उभी असलेली वाहने पोलिस उचलून नेतात; परंतु या रस्त्यावर तशी कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

Web Title: Baji road traffic