बाजरीच्या भावाबाबत महत्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

गुलटेकडी मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होते. तसेच बाजरीच्या नवीन हंगमामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा क्विंटलमागे २००-३०० रुपयांनी भाव कमी झाले आहेत.

मार्केट यार्ड : गुलटेकडी मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होते. तसेच बाजरीच्या नवीन हंगमामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा क्विंटलमागे २००-३०० रुपयांनी भाव कमी झाले आहेत. तर ज्वारीचे उत्पन्न मागील वर्षीप्रमाणे कमी आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव अद्याप ही चढेच आहेत.

हवामानाने व्यवस्थित साथ दिल्याने सर्वत्र बाजरीचे उत्पन्न चांगले निघाले आहे. त्यामुळे बाजारात आवक मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सध्या येणाऱ्या बाजरीचा दर्जा ही चांगला आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी आहेत. बाजारात गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथून बाजरीची आवक होते. जून आणि जुलै हे दोन महिने बाजरीचा हंगाम असतो. सध्या दररोज साधारणतः २५० ते ३०० टन इतकी बाजाराची आवक होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी प्रकाश नहार यांनी दिली.

ज्वारीचे यंदाही उत्पादन कमी आहे. तसेच दर्जा ही कमी आहे.  बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव चढेच आहेत. बाजारात उच्च प्रतीची ज्वारी जामखेड, वाशी, करमाळा, खानदेशातून येते. तसेच दुर्री आणि वसंत या जातीची ज्वारी आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून येते. परंतु त्याचे प्रमाण नग्यन आहे.

ज्वारीचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव जास्त आहेत. तसेच तुलनेने ज्वारीची प्रत चांगली नसल्याने ज्वारी खाणारा ग्राहक बाजरीकडे वळला आहे.- प्रकाश नहार, व्यापारी, मार्केट यार्ड.

बाजरीचे भाव

प्रकार         - वर्ष            भाव ( क्विंटल)
मध्यम -    जुलै  २०२०  -    १९००-२१००
भारी -       जुलै २०२०      - २१००-२३००
.....
मध्यम -    जुलै  २०१९  -    २१००-२३००
भारी -       जुलै २०१९      - २३००-२५००
 

ज्वारीचे भाव

उच्च प्रती -   - ३६००-४८००
- दुर्री - २७५०-२९००
- वसंत - २०००-२२००
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajra prices fell by Rs 300