बजरंगदलाकडून निराधार लोकांना व हातावर पोट असलेल्या लोकांना जेवणवाटप

बजरंगदलाकडून निराधार लोकांना व हातावर पोट असलेल्या लोकांना जेवणवाटप

टाकवे बुद्रुक -  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण भारत देश लाॅकडाऊन करण्यात आला. आणि यामुळे हातावर पोट असलेल्या व निराधार व्यक्तींवर उपाशी राहण्याची वेळ आली. या लोकांचा विचार करुन मावळातील विश्व हिंदु परिषद बजरंग दल यांनी मावळात ठिकठिकाणी निराधार लोकांना व हातावर पोट असलेल्या लोकांना जेवण वाटप करण्याची सेवा हाती घेतली आहे.

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने मावळातील तळेगाव दाभाडे येथील ५०० निराधार लोकांना, कान्हेफाटा येथे १०० निराधार लोकांना, टाकवे एमआयडीसी येथील ७५ निराधार लोकांना, तळेगाव स्टेशन भागात १२५ निराधार लोकांना, देहुरोड येथील २५० रस्त्यावर राहणार्या निराधार लोकांना व पोलिस कर्मचार्यांना जेवण वाटप केले व पोलिस स्टेशन मध्ये डेटाॅल सॅनिटायजर फवारणी, चहा वाटप केला तसेच श्री क्षेत्र देहुगाव येथील २०० लोकांना जेवण वाटप केले.

सध्या लाॅकडाऊन मुळे गरीब लोकांची परिस्थिती खुप गंभीर आहे त्यामुळे शक्य होईल तेव्हड्या लोकांना तुम्ही अन्नधान्य वाटप करुन सहकार्य करा असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com