दौंडमध्ये 'बजंरगी भाईजान' ! बेपत्ता झालेल्या मुलाचा सांभाळ 

रमेश वत्रे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

अमित शफीक सय्यद (रा. हाजीमलंगवाडी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) हा 15 ऑगस्ट रोजी, 'शाळेत जातो' असे म्हणून गेला. मात्र, तो परत आला नाही. पालकांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे शफीक सय्यद यांनी पोलिसांत तक्रार दिली; पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.

केडगाव, जि. पुणे - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेला अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात 'बजंरगी भाईजान' मिळाला. त्यांनी त्याचा सांभाळ केला. अखेर यवतचे पोलिस उपनिरीक्षक राहुल यादव व देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारवकर यांनी त्याच्या आईवडिलांशी भेट घडवून आणली. 

अमित शफीक सय्यद (रा. हाजीमलंगवाडी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) हा 15 ऑगस्ट रोजी, 'शाळेत जातो' असे म्हणून गेला. मात्र, तो परत आला नाही. पालकांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे शफीक सय्यद यांनी पोलिसांत तक्रार दिली; पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. हा मुलगा फिरतफिरत देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे आला. तेथे चिमाजी टुले यांच्या निदर्शनास तो आला. त्यांनी त्याची विचारपूस करत त्याला घरी नेले आणि अंघोळ घालून कपडे, जेवण दिले. काही दिवस त्याचा घरात सांभाळ केला. त्यांनी त्याच्याकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीच बोलत नव्हता. त्यांनी हा प्रकार बारवकर यांना सांगितला. 

बारवकर यांनी याबाबत यवत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गोड बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेव्हा त्याने फक्त शाळेचे नाव सांगितले. पोलिसांनी शाळेचा पत्ता शोधून काढला व लगतच्या पोलिस स्थानकात चौकशी केली. त्यात तो बेपत्ता झाल्याची खबर आढळून आली. त्यानुसार अंबरनाथ पोलिसांनी शफीक सय्यद यांच्याशी संपर्क साधला. ते यवतला आल्यानंतर त्यांच्या ताब्यात अमितला देण्यात आले. तेव्हा सय्यद कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. सय्यद कुटुंबीयांनी ग्रामस्थ व पोलिसांचे आभार मानले. 

अमितचा अंबरनाथ ते दौंड हा प्रवास कसा झाला, याबाबत अद्याप काहीच माहिती मिळत नाही. अमित हा हाजीमलंगवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहे. त्याचे वडील शफीक हे कल्याण ते भिवंडी येथे भाडोत्री रिक्षा चालवतात. 

Web Title: Bajrangi Bhaijaan in daund the care of the missing boy