पिंपरी- चिंचवडमध्ये बकरी ईद उत्साहात 

bakri eid celebrate in pcmc
bakri eid celebrate in pcmc

पिंपरी  : नवीन कपडे, अत्तराचा सुंगध आणि अल्लाहचे नामस्मरण अशा धार्मिक वातावरणात शहरातील मशिदी आणि ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाजपठण करून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद अदा केली. तसेच, कोल्हापूर, सांगली व साताऱ्यातील पूरग्रस्तांसाठी मौलवींनी विशेष प्रार्थना केली. नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत "ईद'च्या शुभेच्छा दिल्या. 

पिंपरी चिंचवड शहरातील ईदगाह मैदाने सकाळी गर्दीने फुलून गेली होती. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. निगडी येथील नुरानी मशीद, ट्रान्सपोर्टनगर मशीद, फातिमा मशीद (ओटा स्कीम), कस्तुरी मार्केट, चिखली रोड येथील शमशुल उलम मशीद, आकुर्डीतील मदिना व अक्‍सा मशीद, नूर ए-इलाही जमात, चिंचवड स्टेशन येथील जामिया गौसिया व अंजुमन- शमा- ए-दिन, चिंचवडगाव येथील आलमगीर शाही मशीद, काळेवाडीतील मदरसा सिरातुल निजाद, वाल्हेकरवाडीतील मदरसा-ए-जामिया ट्रस्ट, चिंचवडेनगर येथील हुसैनी अरबी मदरसा अशा ठिकठिकाणच्या मशीद व मदरशांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, अल्लाहप्रती निष्ठा, त्याग, समर्पण व मानवतेचा संदेश देत मौलवींनी नमाज पढविली. 
नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी बकऱ्याची कुर्बानी दिली. नातेवाईक व मित्रमंडळींना स्नेहभोजनाचे आमंत्रण देण्यात आले होते. तसेच, नातेवाईक, मित्रांच्या घरी जाऊन कुर्बानीचा हिस्सा दिला. महिला व मुलींनी घरोघरी ईदची नमाज अदा केली. 

चऱ्होलीत सामाजिक सद्‌भावना 
चऱ्होली गावातील अहले सुन्नतुल जमात मुलाणी मस्जिद व तकवा शाहीन मशीद येथील मुस्लिम बांधवांनी सामाजिक सद्‌भावना राखून बकऱ्याची कुर्बानी न देता कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील पूरग्रस्तांना मदत केली. चऱ्होली गावातील मुलाणी मशिदीचे हाजी गुलाबभाई मुलाणी, हाजी पापाभाई मुलाणी, महंमद शरीफ मुलाणी, सिराजभाई मुलाणी, रफीकभाई इनामदार, राजूभाई मुलाणी, अय्युब शेख , रहिमानभाई शेख, शफीक मुलाणी यांनी मराठा क्रांती मोर्चा व शिवजयंती उत्सव समितीचे मारुती भापकर, जीवन बोराडे व सागर तापकीर यांच्याकडे मदत सुपूर्त केली. या वेळी माजी महापौर नितीन काळजे व भाऊसाहेब रासकर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com