ईदगाह मैदानावर बकरी ईद उत्साहात साजरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

-  शहर आणि परिसरात आज बकरी ईद उत्साहात साजरी केली गेली. 

- ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. आज सकाळी नऊच्या सुमारास उबेदुल्लाह काझी यांनी नमाजपठण केले.

- नमाज पठणानंतर उबेदुल्लाह काझी यांनी बकरी ईद बाबत माहिती दिली.

बारामती : शहर आणि परिसरात आज बकरी ईद उत्साहात साजरी केली गेली. ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. आज सकाळी नऊच्या सुमारास उबेदुल्लाह काझी यांनी नमाजपठण केले. नमाज पठणानंतर उबेदुल्लाह काझी यांनी बकरी ईद बाबत माहिती दिली.

अल्लाहचे प्रेषित हजरत इब्राहिम, त्यांची पत्नी हाजरा यांची अल्लाहच्या प्रती भक्ती, बलिदान, त्याग आणि विश्वास यांची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. 

इस्लामी कालगणनेनुसार जिल्हज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणा-या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात. आज शहरातील जामे मशिद, चॉंदशाहवली मशीद, कसब्यातील मक्का मशीद, छगनशाह दर्गा मशीद, फातिमा मशीद तसेच मदिना मशीद येथे मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केला. कोल्हापूर सांगली भागात पूरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली अर्पण केली गेली, तसेच मुस्लिम बांधवांनी या प्रसंगी पूरग्रस्तांसाठी निधीही गोळा केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bakri Eid celebrated with enthusiasm at Eidgah Maidan