बालभारतीचा इतिहास फिल्मच्या रूपात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे : बालभारती हा ज्ञानाचा वैभवशाली वारसा आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो.

लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातच, शिवाय जीवनाचे,जगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतात. अशी ही आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात. दरवर्षी करोडो पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही खडतर आणि विलक्षण प्रक्रिया आहे. प्रतिवर्षी एकाचवेळी राज्यातील लाखाहून अधिक शाळांमधील शिक्षक, कोट्यवधी विद्यार्थी आणि तितकेच पालक यांच्याशी आपुलकीच्या अतूट धाग्यांनी बालभारती जोडली गेली आहे.

बालभारतीच्या हा वैभवशाली इतिहास एका माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या समोर आला आहे. सोबत लिंक देत आहे. आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आवर्जून पहा.
- किरण केंद्रेसंपादक ,किशोर, बालभारती

Web Title: Bal Bharti's history in form of film