पुणे : पाटे डेव्हलपर्सचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब काशिनाथ पाटे (वय ७२) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा पाटे, मुलगा नीलेश व योगेश, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मूळचे रांजणगाव (ता. चाळीसगाव) येथील बाळासाहेब पाटे हे १९७५ च्या सुमारास पुण्यात आले. इस्टेट एजन्सीच्या व्यवसायातून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर १९८३ च्या सुमारास त्यांनी प्रमोद वाणी यांच्यासमवेत पाटे डेव्हलपर्सची स्थापना केली. विश्वास व गुणवत्तापूर्ण बांधकामाच्या बळावर त्यांनी दीडशेहून अधिक गृह व व्यावसायिक प्रकल्पांच्या माध्यमातून सात हजारांहून अधिक घरांची उभारणी केली.
यासोबतच त्यांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांना पाठबळ देत मार्गदर्शन केले. सर्वांशी थेट संपर्क आणि स्नेह हा त्यांच्या स्वभावाचा अनोखा पैलू होता. विविध संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.