Pune News : दिलीप कचेरे यांना आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जुन्नर तालुका पंचायत समितीचे आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) दिलीप कचेरे यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
balasaheb thackeray Arogya Ratna award to Dilip Kachere junnar
balasaheb thackeray Arogya Ratna award to Dilip Kachere junnarsakal

जुन्नर : आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जुन्नर तालुका पंचायत समितीचे आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) दिलीप कचेरे यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी दिली.

पुणे आरोग्य विभागात कार्यरत असलेले प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तथा आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे नेहमीच वैविध्यपूर्ण कार्य करत असतात.'हसत खेळत डासांवर पाळत' या कीटक शास्त्रीय आजारावर त्यांनी विविध ठिकाणी आरोग्य विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३८५ हुन अधिक व्याख्याने देऊन आरोग्य शिक्षण दिले आहे.

साहित्य क्षेत्रात देखील कचेरे नावारूपाला आलेले असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे लेखक म्हणून अधिकृत सदस्य आहेत. डंख, सावरगावची सुमन, इत्यादी लघुचित्रपटाची निर्मिती व लेखन करून, गुड मॉर्निंग करोना या लघु चित्रपटात अभिनय केला तसेच भारुडाची रचना व गायन केले आहे.

जनतेमध्ये आरोग्य शिक्षण देण्याचा अनेक माध्यमाद्वारे प्रयत्न केला आहे. सध्या युट्युबवर दामूआण्णाच्या करामती ही मराठी विनोदी वेब सिरीज चालू आहे. यात कीटक जन्यआजार, अंधश्रद्धा निर्मूलन, बिबट्या पासून आपले संरक्षण कसे करावे? अशा विविध विषयावर कचेरे यांचे विनोदी भाष्य करण्यात यशस्वी झाले आहेत.

या वेब सिरीजची लेखनाची जबाबदारी दिलीप कचेरे यांनी पार पाडली आहे. विविध दिवाळी अंक, दैनिके, महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या आरोग्य पत्रिकेत विविध विषयावरील लेख, कवितांचे लेखन केले आहे. हा पुरस्कार येत्या २३ जानेवारी रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करणार येणार आहे. डॉ.वर्षा गुंजाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com