बालभारतीची पुस्तके पिंपरीत दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडून मागविलेली (पहिलीची वगळता) सर्व शालेय पाठ्यपुस्तके दाखल झाली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत येत्या पाच जूनपासून २० केंद्रावरून ती वितरित करण्यात येतील. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, असे शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी सांगितले.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यासाठी २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षातील महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडे सहा लाख दोन हजार ५९६ पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार बालभारतीने पुस्तकांची छपाई केली. शिक्षण विभागाच्या एकूण मागणीपैकी  ८६ टक्के पुस्तके महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या शहर  साधन केंद्रावर दाखल झाली  आहेत. 

‘‘यावर्षी पहिली, आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यानुसार आठवीची नवीन पुस्तके छापली असून, सर्व माध्यमांची आठवीची पुस्तके दाखल झाली आहेत. दहावीचीदेखील पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र, बदललेल्या अभ्यासाक्रमापैकी इयत्ता पहिलीची पुस्तके अद्याप केंद्रावर दाखल झालेली नाहीत. पहिलीची ३७ हजार ६४० पुस्तके १५ जूनपर्यंत मिळण्याची  शक्‍यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

शहर साधन केंद्राअंतर्गत आकुर्डी केंद्रासाठी अनसुया वाघेरे इंग्रजी विद्यालय, तर पिंपरी केंद्रासाठी विद्या निकेतन महापालिका विद्यालय व कर्मवीर भाऊसाहेब पाटील विद्यालय या शाळांमध्ये ही पुस्तके ठेवली आहेत. या केंद्रांच्या अखत्यारितील शाळांमध्ये पाच जूनपासून पुस्तके वितरित करण्यात येतील,’’ अशी माहिती विषयतज्ज्ञ प्रदीप शिंदे यांनी दिली.

Web Title: balbharti book in PCMC