#Balbharti बालभारतीला प्रकाशकांचा ठेंगा

Balbharti
Balbharti

पुणे - ‘बालभारती’ची कसलीही परवानगी न घेताच अनेक प्रकाशक शालेय पुस्तकांची छपाई करून त्यांची विक्री करीत आहेत. हे प्रकाशक स्वतः मालामाल होताना ‘बालभारती’ला मात्र ठेंगा दाखवित आहेत. वर्षभरात केवळ ८३ जणांनीच कॉपीराइटचे शुल्क भरून छपाईची परवानगी घेतली असून, त्यातून ‘बालभारती’ला २ कोटी ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. 

शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई, वितरण यासाठी १९६७ मध्ये ‘बालभारती’ची सुरुवात झाली. पुस्तकात सर्व प्रश्‍नांची उत्तरे असली तरी सहज उत्तरे मिळावीत व चांगले गुण मिळविण्यासाठी अनेक जण गाइडचा वापर करतात. परीक्षा जवळ आली, की खासगी प्रकाशकांकडून खास पुस्तके बाजारात आणली जातात. त्यास विद्यार्थ्यांकडूनही मोठी मागणी असते.

गेल्या अनेक वर्षांपासून खासगी प्रकाशक ‘बालभारती’च्या पुस्तकांची नक्‍कल करून गाइड व इतर पुस्तकांची छपाई व विक्री करीत होते. कॉपीराइटचा भंग होत असल्याने शासनाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी खासगी प्रकाशकांना यासाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. या निर्णयाला प्रकाशकांनी विरोध केला होता; परंतु परवान्याची प्रक्रिया ऑनलाइन व शुल्क चर्चा करून निश्‍चित करण्यात आले होते. ज्यांनी नोंदणी केली, त्या प्रकाशकांना अधिकृत ‘टायटल’ दिले जाते. त्याचा वापर करून पुस्तके, गाइड, प्रश्‍नसंच तयार करून विक्री करण्याची मुभा आहे.

राज्यात अनेक प्रकाशन संस्था गाइडसह इतर पुस्तके काढत असल्या तरी गेल्या दोन वर्षांत केवळ १५७ प्रकाशकांनी परवाना घेतला आहे. त्यातून ४ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न ‘बालभारती’ला मिळाले आहे. ज्या प्रकाशकांनी विनापरवाना पुस्तके काढली आहेत, त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com