मुलांच्या रेषांची भाषा समजून घ्या - राजीव तांबे

बालगंधर्व कलादालन - ‘बालचित्रांची दुनिया’ चित्रप्रदर्शनात लहानग्यांनी कागदावर रेखाटलेले भावविश्‍व पाहताना पालक आणि चिमुरडे.
बालगंधर्व कलादालन - ‘बालचित्रांची दुनिया’ चित्रप्रदर्शनात लहानग्यांनी कागदावर रेखाटलेले भावविश्‍व पाहताना पालक आणि चिमुरडे.

पुणे - बोबडे वळण असलेली लहान मुलांची भाषा आपण समजून घेतो. त्याचप्रमाणे त्यांनी काढलेल्या चित्रांच्या रेषांची भाषा समजून घ्यावी. लहानग्यांच्या चित्रांतून त्यांचे भावविश्‍व कागदावर उमटते. त्यांची ही शिकण्याची प्रक्रिया पालकांनी समजून घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ लेखक राजीव तांबे यांनी केले.

बालगंधर्व कलादालन येथे गमभन प्रकाशन आयोजित ‘बालचित्रांची दुनिया’ चित्रप्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला बॅंक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक पी. आर. खटावकर, ल. म. कडू, बालशिक्षण मंदिराची छोटी चित्रकार रावी कडू, सई मारे आदी उपस्थित होते. रावीच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन शनिवार (ता. ७)पर्यंत खुले राहणार आहे. तांबे म्हणाले, ‘‘मुलांचे चित्र आखीव रेखीव नसले, तरी ते चित्र रेखाटताना त्यांना मिळणारा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. चित्र हा मुलांचा आरसा आहे.’’ कलेच्या प्रांतात पालकांनी मुलांना कमीत कमी सांगावे, असा सल्ला देताना कडू म्हणाले, ‘‘पालकांनी आपले बालपण आठवून मुलांशी वागावे, तरच मुलांच्या भावना कळतील. मोठ्या माणसांच्या भूमिकेतून मुलांसोबत वागल्यामुळे त्यांच्या भावविश्‍वाकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे.’’ ज्या गोष्टी बोलण्यातून उलगडत नाही, त्या चित्रातून उलगडतात, असे मत खटावकर यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com