‘बालगंधर्व’मध्ये रंगोत्सवाची बहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

पुणे - फक्त हार्मोनियमवरील कळपट्टिका तसंच तबल्याची रेखीव जोडी यांच्या बरोबरीने धावणारी हरिणं, उडणारे पक्षी, फुलपाखरू यांच्या विविध प्रकारच्या आकार व रंगछटांची किमया सध्या बालगंधर्व कलादालनात अनुभवायला मिळत आहे. निमित्त आहे ‘रंगोत्सव’ या चित्रप्रदर्शनाची. पुष्पराज आठलेकर व स्वाती आठलेकर या हौशी चित्रकार बहीण-भावांनी येथे मांडलेल्या ११० चित्रांमधून गणपतीची विविध रूपं पहायला मिळतात. पाण्यात पडलेलं झाडांचं प्रतिबिंब जेवढं मोहक तेवढंच पानावरील दवाच्या थेंबाचं रूप लोभस. दोन छोट्या मैत्रिणींच्या शेजारी बसलेली मनीमाऊ खूप गोड दिसते. खिडकीचं एक चित्रही अत्यंत वेधक आहे. 

पुष्पराज व स्वाती यांनी सांगितलं, की आमचे वडील रविंद्रनाथ आठलेकर हे कलाशिक्षण घेतलेले चित्रकार होते. आम्ही त्यांना सतत चित्र काढताना बघायचो. त्यामुळेच असेल कदाचित; पण आम्ही बहीण-भाऊ उपजतपणे चित्र काढू लागलो. आम्ही दोघे इलेक्‍ट्रॉनिक्‍स व टेलिकम्युनिकेशन या विद्याशाखेतून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आमचं हे पहिलंच प्रदर्शन. यासाठी खास चित्रं काढण्यासाठी आम्ही दोन वर्षांपासून मेहनत घेत होतो. ॲक्रेलिक व तेलरंगांचा वापर करून साकारलेली ही चित्रं काढतानाची प्रक्रिया आम्हाला समाधान व आत्मविश्वास देऊन गेली. या प्रदर्शनाचा उद्या (ता. २०) शेवटचा दिवस आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balgandharv Rangotsav