‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२’ रंगणार शनिवारपासून

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शनिवारपासून (ता. २५) ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे.
balgandharva auditorium
balgandharva auditoriumsakal
Summary

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शनिवारपासून (ता. २५) ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे - बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शनिवारपासून (ता. २५) ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘शनिवार (ता. २५), रविवार (ता. २६) व सोमवार (ता. २७) असे तीन दिवस महोत्सव होणार असून महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी दुपारी १२.३० वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात ‘यशस्वी मराठी चित्रपटांची यशोगाथा’ या विषयावर चर्चासत्र, ‘रंगभूमी आणि रंगमंदिर’ या विषयावर परिसंवाद, ‘फिटे अंधाराचे जाळे’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम, लता मंगेशकर आणि बप्पी लहरी यांच्या गीतांची संगीतरजनी, संतवाणी, लावणी महोत्सव, एकपात्री जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, बिग बॉसच्या गंमजीजमती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, अजय पुरकर, मंगेश देसाई, स्वप्नील जोशी, अभिनेत्री अमृता खानविलकर, गार्गी फुले आदींशी संवाद होणार आहे’, असे राजेभोसले यांनी सांगितले.

‘बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यासाठीच असुविधा’

‘बालगंधर्व रंगमंदिरात स्वच्छतागृहांची, ग्रीन रुमची दुरावस्था झाली आहे. पाण्याचा प्रश्न आहे. मात्र या असुविधा जाणीवपूर्वक निर्माण केल्या जात आहेत. या समस्यांना कंटाळून कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या प्रस्तावाला होकार देतील, यासाठीचे हे प्रयत्न आहेत’, असा दावा मेघराज राजेभोसले यांनी केला. मात्र, बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्याचा पुनर्विकास करण्याच्या प्रस्तावाला आमचा विरोध कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com