दीपावलीनिमित्त माऊली बालकाश्रमातील बालकांना मिठाई व फराळ वाटप

इंदापूर - येथील माऊली बालकाश्रमात दिवाळी फराळ व मिठाई वाटप करताना शहा ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य.
इंदापूर - येथील माऊली बालकाश्रमात दिवाळी फराळ व मिठाई वाटप करताना शहा ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य.

इंदापूर - इंदापूर येथील कै. कन्हैयालालजी शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त माऊली बालकाश्रमातील बालकांना मिठाई व फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष नवनीतलाल शहा, उपाध्यक्ष वृंदावन शहा, खजिनदार मुकुंद शहा, आश्रम व्यवस्थापक सुशील शेटकर यांच्या हस्ते फराळ वाटप झाले.

यावेळी ट्रस्ट्चे खजिनदार मुकुंद शहा म्हणाले, इंदापूर बाजार समितीचे संचालक कै. कन्हैयालाल शहा यांच्या समाजसेवी कार्याचा वारसा पुढे चाल- विण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. आश्रमातील बालकांना मिठाई व फराळ वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरीलआनंद हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. 

सचिव अमाेल शहा म्हणाले, ट्रस्टच्या माध्यमातून वस्तू व सेवा कर, आय कर संदर्भात मोफत कार्यशाळेचे दरवर्षी शहरात आयोजन करण्यात येते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील शेकडो वारकऱ्यांना अन्नदान, फळे व चहापाणी वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे बालकाश्रमात दिवाळी फराळ व मिठाई वाटप करण्यात येते. ट्रस्ट सामाजिक कार्यासाेबत शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात देखील विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सुत्रसंचालन प्रमाेद शहा तर आभार नितीन शहा यांनी मानले. यावेळी रुचिरा शहा, अनुज शहा, आर्यन शहा, रितिका शहा, साेनिश शहा, साची शहा, आथेश शहा, महामित्र शिवराज परमार, गौरव गानबाेटे तसेच शहा ट्रस्टचे महिला सदस्य उपस्थित हाेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com